बलात्कार झाला तर काय करावे?
X
जगभरात महिला आणि मुलींच अस्तित्व आपण कितीही प्रगती केली तरी शरीरातील लैंगिक अवयवांच्या उपयुक्ततेवरच गणलं जातं. अगदी पाश्चिमात्त्य देशातही बलात्कार होतातच. बलात्कार करणारे मानसिक दृष्ट्या विकृत तर असतातच पण लिंगपिसाट लैंगिक भावनेने चटावलेले असतात. त्यामुळेच आपल्या देशात कितीही कठोर कायदे होऊनही वैयक्तिक आणि सामुहिक बलात्कार होतातच.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नोंदवलेल्या अहवालानुसार वर्षभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. पोलिस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या तक्रारीची ही कार्यालयीन आकडेवारी असते. बलात्कार होऊनही कुटूंबाची बदनामी, समाज, नातेवाईक काय म्हणतील? वैयक्तिक आयुष्यांवर होणारे दुरगामी परिणाम, बलात्काऱ्यांची भीती, धमक्या ईत्यादी कारणांमुळे बहुतांश बलात्कार मारले जातात ते वेगळेच.
समाजात बलात्कार करणारे वयाचं समाजाचं भान ठेवत नाहीत. ते केवळ लिंग पाहतात. मग ते ४ वर्षाच नुकतंच जगात आलेलं संभोगास अपरिपक्व आहे का? किंवा संभोगास प्रतिसाद न देणारं वय ही पहात नाहीत. बलात्कार हे अल्पवयीन मुलीवर ते ही सामुहिक करण्याचे प्रमाण वाढल्याचे चिञ निर्माण झालंय.
बलात्कार म्हणजे काय? लैंगिक संभोग कशाला म्हणतात? लिंग, यौनीची समज नसणाऱ्या वयात बलात्कार होतात. पण मुलीचे पोटात दुखायला लागलं, मौनी मुख फाटल्यामुळे त्यावर सुज आल्यामुळे रक्तस्ञाव होणे, ईत्यादी कारणांमुळे कुटूंबातील लोकांच्या लक्षात येतं की हा बलात्कार आहे.
लगेच लक्षात आले तर त्या पिडीतेचे अंगावरील कपडे बदलू नयेत. कारण, कायद्यानुसार फौजदारी दंड संहितेचे कलम १०२ नुसार पिडीतेचे कपडे जे बलात्कार होताना तिचे अंगावर होते. निकर सहीत. पोलिस जर पिडीतेकडुन तक्रार आली तर जप्त साक्षीदारांची समक्ष केले जातात आणि प्रत्यक्ष कोर्टात केस साक्षकामी उभी राहिल्यास जप्त केलेल्या कपड्यावरील पंचनामा कामी पंच साक्षीदारांच्या जवाब घेतला जातो. जो भारतीय पुरावा कायद्याचे कलम १५७ नुसार ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ते कपडे धुऊ नयेत कारण त्या कपड्यावर आरोपीचे वीर्य पडल्याचे डाग, गुप्तांगावरील केस लागण्याची शक्यता असते. यामुळे याच आरोपीने बलात्कार केल्याचे सिद्ध होऊ शकते, जरी आरोपीने बलात्कार करताना कंडोम किंवा तत्सम ईतर रोधकाचा वापर केला असला तरी.
पिडीतेच्या यौनीचा भाग धुऊ नये किंवा आंघोळ करू नये. कारण तक्रार दिल्याबरोबर संबंधित पोलिस स्टशेनमधुन पञ घेऊन वैद्यकीय तपासासाठी सरकारी दवाखान्यात पाठवले जाते जे बलात्कार झालाय हे सिद्ध करण्यासाठी कायदेशीर उपयोगी ठरते. डॉक्टर ते ही स्ञीरोगतज्ञच असावेत. पिडीतेला पाळी येत असेल तर पाळी येऊन गेल्याची तारीख सांगावी. कारण बलात्कारानंतर पिडितेला गर्भधारणेची शक्यता अधिक असते.
बलात्कार झाल्यानंतर काय करावे? तर माझ्या मते प्रथम झालेल्या अत्याचाराची ईतंभुत माहिती आपल्या जवळच्या विश्र्वसनीय नातेवाईक किंवा व्यक्तींना द्यावी. जेणेकरुन पिडीतेला एकटे वाटणार नाही, मानसिक दृष्ट्या जे गरजेचं आहे. बलात्कार हा पिडीतेने केलेला अपराध नसुन तिच्यावर झालेला तो एक शारिरिक अपघात आहे. हे प्रथम तिच्या मनावर तिचा विश्र्वास असणाऱ्या प्रियजनांनी बिंबवावे त्यामुळे पिडीतेचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्भयपणे कायदेशीर कार्यवाहीला तोंड देता येईल.
आपल्या देशात निर्भया केस नंतर २०१२ साली युपीए सरकारने बलात्काराचे कलम ३७६ भारतीय दंड संहितामध्ये दुरूस्ती करून A,B,C,D अशी वर्गवारी केली आहे. यात हिंसेला व्यापक करून अधिक गंभीर केले आहे.
बलात्कार केवळ लिंग यौनी मध्ये घालुन केलेला संभोगच नाही. तर लिंग तत्सम म्हणजे पेन्सील, पेन, खिळा, ईत्यादी यौनीत संभोगाचा आनंद घेण्याचे हेतुने केलेला गुन्हा सुद्धा या कलमानुसार तेवढाच गंभीर मानला आहे.
त्यामुळे बलात्कार झाला तर तो दाबुन न ठेवता त्याची कायदेशीर तक्रार करा.
- अॅड हेमा पिंपळे