मुलांना आभासी दुनियेतून कसं बाहेर काढाल?
X
लहान मुलांचं खेळणं-खिदळनं, हसरा चेहरा, बोबडे बोल यामुळे घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरामध्ये लहान मुलांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या सकारात्मक कृतीमुळे तुम्हाला जगण्याचा नवा मार्ग मिळतो.
परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातलं असताना घरातलं आनंदी वातावरण संपलं की काय असं वाटू लागलं आहे. त्यात घरातून कुणाची तरी कोरोनामुळे होणारी एक्झिट मनाला चटका लावून जाणारी असते.
अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा घरातल्या चिमुरड्यांच्या आरोग्याचा विषय येतो. तेव्हा जीव कासाविस होतो. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही विचार करणं महत्त्वाचं होतं. अशावेळी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न तुम्हाला सतावत असतो. नेमकं काय करावं? शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे मुलांचा बाहेरचं जग, मैदानी खेळ अशा अनेक गोष्टीपासून त्यांचा संपर्क तुटला आहे.
सतत हातात असणारा मोबाईलमुळे मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल. हा विचार करताना या आभासी दुनियेतून त्यांना बाहेर कसं आणावा हा मोठा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? त्यांना आनंदी कसं ठेवता येईल? त्यांच्याशी नेमका संवाद कसा करावा?
कोविड काळात शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही दृढ झाल्याचं चित्र समाजात पाहायला मिळत आहे. अनेक जण नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांच्या (लहानांपासून-वृद्धांपर्यंत) मानिसक आरोग्याची जनजागृती करण्याचा ध्यास मॅक्स महाराष्ट्र, मॅक्सवुमन आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने 'जनजागृती मानसिक आरोग्याची' या विशेष कार्यक्रमातून करणार आहोत.
लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांनी आयकॉल च्या प्रोग्राम ऑफिसर प्रेरणा यादव यांची घेतलेली विशेष मुलाखत नक्की पाहा..