महाराष्ट्राची तेजस्विनी माय !
अठराव्या शतकात विधवा, अनाथ, विकलांग ह्यांच्यासाठी विशेष कार्य करणाऱ्या पंडितां रमाबाई यांच्या जीवनावर मातृ दिनाच्या निमित्ताने रॉबर्ट पीटर परेरा यांचा हा लेख नक्की वाचा
X
अठराव्या शतकात विधवा, अनाथ, विकलांग ह्यांच्या साठी विशेष कार्य करणाऱ्या पंडितां रमाबाई ह्यांचा मातृ दिनाच्या निमित्ताने आपण आठवण करू या. अफाट बुद्धिमान, विलक्षण साहस असलेल्या रमाबाई ह्याचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी चित्तपावन ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडिलांच्या नाव अनंत शास्त्री व आई च्या नाव लक्ष्मीबाई होत्या. आईवडील संस्कृतात पारंगत होते आणि संस्कृत विद्या दान करत होते.
अनंत शास्त्री आपल्या पत्नीला संस्कृत शिकविले त्यामुळे त्यांना शेजारच्या कडून आणि घरच्या माणसांकडून फार त्रास सोसावा लागला त्यांनी गाव सोडल्यानंतर सर्व
कुटुंबासह हिंदुस्तान तीर्थयात्रा सुरुवात केली सोळाव्या वर्षी ह्या कुटुंब मद्रास प्रांतात पोहोचले त्यावेळी दुष्काळाचे संकट उभे ठाकले होते. त्यातच रमाबाई ह्यांच्या आईवडील आणि बहीण ह्याचा सहा महिन्याचा कालावधीत मृत्यू झाला. श्रीनिवास आणि रमाबाई ह्यानी आपल्या तीर्थयात्रा व्रत चालू ठेवले. तीन चार वर्षे पायपीट करत कलकत्ता येथे पोहोचले. तिकडे मात्रं त्यांच्या विद्व त्याच्या साफल्य झाले. रमाबाई विद्यापीठ बोलावून पंडितi सरस्वती असे बिरुद अर्पण केल्या.
अल्प काळात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला नंतर त्यांनी भावाच्या मित्र बिपीन ह्यांच्याशी आंतरजातीय विवाह केला पण दुर्दैवाने विवाहानंतर 19 महिन्यात बिपीन ह्यांचा साथीच्या रोगाची लागण झाल्याने मृत्यू झाला. आता मनोरमा ही बाईंची कन्या हा एकाच विरंगुळा उरला.
ह्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना वैद्यकीय शिक्षण घेऊन सामाजिक कार्य करण्याची जिद्द होती. इंग्लंड जावून वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चासाठी 'स्री धर्म नीती ' नावाच्या पुस्तक लिहून आपला खर्च केला. महाराष्ट्रातील प्रथम महिला लहान मुली सोबत इंग्लंड जाण्याचा साहस केल. तिथं गेल्यावर तिथल्या स्त्रियांना मराठी-संस्कृतच्या शिकवणीतून त्यांचा अर्थार्जनाचा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र झेलमकाठच्या थंडीत एका कानाला बहिरेपण आल्यामुळे दुर्दैवानं रमाबाईंना वैद्यकीय शिक्षण घेता आलं नाही.
ह्या कालावधीत परित्यक्ता स्त्रियांसाठी होत असलेल्या काम पाहून त्यांना कुतूहल वाटल्या व त्यांच्या कारण शोधताना त्यांना येशू ख्रिस्तव्यक्तिमत्त्वा तिल समता, करुणा भावली व तिने बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्म स्विकारला. रमाबाई कधीही मांसाहार केला नाही. आपले आचार अणि विचार अणि विद्रोही स्वभावाशी कधीही फारकत घेतली नाही. ख्रिस्ती धर्म मधील उणीवा जगासमोर आणल्या. पं. रमाबाई यांना परदेशात स्थिरस्थावर होऊन पुन्हा विवाह करून आनंदात आणि समृद्धीत आयुष्य व्यतीत करता येणं सहजशक्य होतं. परंतु आपले भारतीयत्व त्यांनी जपलं. भारतातील सर्व प्रकारच्या गांजलेल्या स्त्रियांना उर्जितावस्थेत आणण्याचं कार्य करण्याचा वसा त्यांनी घेतला होता.
शारदा सदनाची स्थापना
रमाबाईंनी शारदासदन या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889रोजी मुंबईत विल्सन कॉलेजजवळ 169, गिरगाव चौपाटी जवळच्या एका भाड्याच्या घरात केली. त्यासाठी त्यांना अमेरिकेतून रमाबाई असोसिएशननं दहा वर्षं आर्थिक मदत पुरवली.
सुरुवातीला शारदा सदनात 18 विधवा होत्या. मुंबईपेक्षा पुण्याची हवा चांगली, शिवाय तिथं स्वस्ताई आहे, असा विचार करून रमाबाईंनी शारदासदन 1890च्या नोव्हेंबरात पुण्यात आगाखानांच्या बंगल्यात हलवल . काही कालावधीनंतरशारदा सदन आपल्या मालकीच्या इमारतीत स्थिरावलं. ख्रिस्ती संस्थेला हिंदू देवतेचं नाव दिल्यावरून ख्रिस्ती लोकांची नाराजी बाईंनी ओढवून घेतली. खरं तर, संस्थेत पहिली जी मुलगी दाखल झाली होती तिचं नाव होते शारदा गद्रे. तिचंच नाव रमाबाईंनी संस्थेला दिलं होतं. ही शारदा गद्रे बालविधवा नव्हती तर पुनर्विवाहित आईची मुलगी होती.
**मुक्तिमिशन*
रमाबाई असोसिएशनची दहा वर्षांची मुदत संपत आल्यावर पुण्याजवळ 34 मैलांवर असलेल्या केडगाव इथली खडकाळ जमीन स्वस्तात विक्रीला होती. दूरदृष्टीच्या रमाबाईंनी ती विकत घेतली.
त्याच सुमारास पुण्यात प्लेग फोफावला आणि पुणे म्युनिसिपालिटीनं त्यांना आणि मुलींना 48 तासांच्या आत पुण्याबाहेर जाण्याचा आदेश दिला. रमाबाई आपलं शारदासदन केडगावला घेऊन गेल्या आणि तिथं झोपड्या उभारून राहिल्या. काही दिवसांतच तिथं पक्क्या इमारतींचं मुक्तिमिशन उभे राहिलं. ती तारीख होती 24 सप्टेंबर 1898.
मुक्तिमिशनमध्ये पं. रमाबाईंनी जी कामे केली, त्याला इतिहासात तोड नाही. अंध स्त्रियांसाठी ब्रेल शिक्षणाची सोय करणं, चाळीस एकर रुक्ष जमिनीतील काही जमीन शेतीसाठी तयार करून तिच्यातून वेगवेगळी पिके काढणे, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणं, वाकाच्या दोऱ्या वळणं, वेताच्या खुर्च्या विणणे (ही कामं अंध स्त्रियादेखील करत असत), लेस, स्वेटर आणि मोजे विणणे.
या शिवाय गायी बैलांचे खिलार, शेळ्या-मेंढरांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध-दुभतं, कोबड्यांची पोल्ट्री, सांडपाणी मैल्यापासून शेतीसाठी खत, भांड्यावर नावं घालणं, भांड्यांना कल्हई करणं, हातमागावर कापड-सतरंज्या विणणं, घाण्यावर तेल काढणं, छापखाना - त्यात टाईप जुळवणे सोडणं, चित्र छापणे, कागद मोडणे - पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम करणे, शेतात पिकलेले धान्य, भाजीपाला, दूधदुभते यांचा पुरवठा सरकारी ऑर्डर्स घेऊन करणे, या सर्व उद्योगांसाठी प्रशिक्षित पुरुषमाणसांकरवी त्यांनी मुलींना तयार केलं.
हिशेब त्या स्वतः रोज बघत. आपल्या देखत त्यांनी या सगळ्या कामांत स्त्रियांना तरबेज केलं. अनेक प्रकारचे कुटीरउद्योग सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तिकडे स्त्रीशिक्षणाची चळवळ उभी केली.
पं. रमाबाईंनी भारतीय जनतेचा प्रवास आणि देशाचे दळणवळण या सोयींसाठी आपल्या मुक्तिमिशनच्या मालकीच्या जमिनीतला भाग रेल्वेमार्गासाठी देऊन मोकळा करून दिला. एकटी बाई, विधवा बाई, अबला असली विशेषणे त्यांनी कधी लावून घेतली नाहीत. त्यांच्या बाणेदार आणि फटकळ स्वभावामुळे लोक त्यांना वचकून असत.
माणसांपेक्षा देवावर त्यांनी अधिक भिस्त ठेवली. 'परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, मनुष्य माझे काय करणार?' हे बायबलमधील वाक्य त्यांच्या मनावर अनुभवानं बिंबलं होतं. त्यामुळेच एकुलत्या एका कन्येचा ऐन तारुण्यात झालेला मृत्यूही त्यांनी शांतपणे स्वीकारला.
स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, स्वालंबन या त्रिसूत्रीवर भर देणारी समाजसुधारक म्हणून पंडिताबाईंना कैसर-ए-हिंदचं 45 ग्रॅम वजनाचं सोन्याचं पदक बहाल करण्यात आलं.
**
रमाबाईंनी विविध विषयांवर ग्रंथरचना केली. पं. रमाबाई हा अनेकांच्या साहित्याचा विषय झाल्या. मूळ भाषांमधून त्यांनी एकटीनं सातत्याने 18 वर्षे बायबलच्या भाषांतराचे काम पूर्ण केले आणि शेवटीची प्रुफे तपासली, त्याच रात्री त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. (5 एप्रिल 1922).
समर्थ रामदास स्वामींनी सांगितले प्रमाणे "मरावे परी कीर्ती रुपे उरावे" ह्या प्रमाणे आपल्या उक्ती आणि कृती समान राखून ऋषी तुल्य जिवन जगण्याचा मार्ग महाराष्ट्राची तेजस्विनी माय रामाबाईने समस्त जगताला दाखवला.