महिला दिन विशेष : शेतातील खुरप ते खाकी पर्यंतचा थक्क करणारा प्रवास...!
X
महिला दिन विशेष | बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेलं सगळ्यात छोटा गाव म्हणजे "थेरला" या गावात डोंगर पट्टा असल्याने अनेक वेळा पीक हे नसल्यासारखंच त्यामुळे गावातील अनेक जण हे ऊसतोड कामगारच आणि ऊसतोड कामगारांच्या घरात जन्मलेली वैशाली सदाशिव राख. घरची परिस्थिती बिकट तर घरात दोन भाऊ आई वडील आणि वैशाली जेमतेम हाताशी काम असलेल्या वडिलांना अचानक एक दिवस मुलीसाठी एक स्थळ आलं आणि ते स्थळ गावातच असल्याने त्यांनी देखील लगेच होकार दिला मात्र अवघ्या चौदाव्या वर्षीच वैशालीचा विवाह झाला संसार ,लग्न, पुढे काय असतं या कोणत्याही गोष्टीची जाण नसताना देखील वैशालीला संसाराचं ओझं हे खांद्यावर घ्याव लागल तसा संसार खुलु लागला मात्र यात विघ्न पडलं ते संकटाचा....?
अवघ्याच चौदाव्या वर्षी लग्न झालेल्या वैशाली यांना दोन वर्षात म्हणजे सोळा वर्षे पहिली मुलगी झाली मात्र यामध्ये आनंदात असलेला संसार यात हळुवार कुठेतरी नापिकेचा संकट वैशाली यांची पती भरत यांना सतावत होतं सतत आयुष्याचा जुगार हा मातीशी चालू होता प्रत्येक वेळी चांगले पीक येईल आणि कर्ज भेटेल या अशे पोटी त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत अनेक वेळा पेरणी केली मात्र नापिकी दुष्काळ गारपीट या सगळ्या गोष्टीत भरत त्यांच्यावर कर्ज वाढत गेलं त्यातच पुन्हा दोन वर्षात त्यांना अजून एक आपत्य झालं ती ही मुलगीच यात आनंदी एकीकडे असताना डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर यासाठी अनेकांनी तगादा लावला आणि याच विवेचनेपोटी वैशाली यांचे पती यांनी आत्महत्या केली अचानक विसाव्या वर्षीच संसार हा अर्ध्यावर मोडल्याने वैशाली या पुरत्या खचून गेल्या कारण माहेरी कोणीच शिकलेला नाही तर सासरचे कोणीही बोलत नव्हतं या सगळ्यात करणार काय शेवटी हाती खुरप होतं मात्र यामध्ये देखील पदरी असलेल्या दोन चिमुकल्यांचा संभाळ करण्यासाठी शेतीत काम करून काहीच हाती लागणार नव्हतं यावेळेस वैशालीने शिक्षण करण्याचा निर्णय घेतला अवघ्या नववी वर सुटलेलं शिक्षण त्यांनी बारावीचा फॉर्म भरत बारावीचे शिक्षण पूर्ण केलं मात्र चांगली नोकरी लागण्यासाठी अजून शिक्षणाची गरज होती. मात्र त्यात काय करणार नेहमीच गावात पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं पाहिल्यानंतर वैशालीला वाटायचं की आपणही ते कराव यातच बारावी मध्ये मिळालेल्या मैत्रिणींनी देखील आम्ही पोलीस भरती करतोय आणि बारावी वर नक्कीच भरतीत आपण सिलेक्ट होतो असा विश्वास दाखवल्यानंतर वैशाली यांनी शहरात जाऊन अजून पोलीस भरतीसाठी काय शिक्षण लागतं हे पाहण्याचं ठरवलं मात्र यासाठी लागणार होता पैसा मात्र त्यातही त्यांनी पोलीस भरतीसाठी तयारी ही गावात सुरू केली गावातील मुलं सकाळी प्रॅक्टिस करायचे ते पाहत पाहत वैशालीने देखील प्रॅक्टिस सुरू केली मात्र त्या ठिकाणीही पदरी निराशा पडली कारण इतरांच्या कुटुंबांनी त्या मुलांना वैशालीसह प्रॅक्टिस करू नकोस कारण विधवा सोबत असणं हे चुकीचं चुकीचं असतं तुमचंही भरतीत सिलेक्शन होणार नाही यामुळे गावातील अनेकांनी आपल्या मुलांना तिच्यापासून दूर राहायला सांगितलं कारण आजही अशा रूढी परंपरा मानणारी लोक आहेत कारण या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर वैशालीने चक्क घरच्यांना विचारून शहरात येण्याचा ठरवलं मात्र या ठिकाणीही घरच्यांनी विरोधक दर्शवला इतके जण प्रॅक्टिस करतात इतके जण भरती देतात मात्र भरती होत नाही तू कशी भरती होशील यामुळे तिला विरोध ही घरातूनच सुरू झाला मात्र याकडे दुर्लक्ष करत त्यांनी चक्क गाठलं ते बीड आणि याच ठिकाणी एका अकॅडमी तिने आपलं नाव नोंदवलं आणि त्याच ठिकाणी पुन्हा संघर्ष सुरू केला मात्र हा संघर्ष या ठिकाणी ही तिची पाठ सोडत नव्हता कारण घरून अवघे 500 रुपये घेऊन आलेली वैशाली या पाचशे रुपयात पुढील सगळं कसं भागणार त्यामुळे एक वेळेस जेवण करत वैशाली ही प्रॅक्टिस करू लागली यात ग्राउंड वर पळायचं म्हटलं की चांगला शूज बूट पायात असावा असा अकॅडमीत बोलले जात होतं मात्र दोनशे रुपयांचा बूट घेण्याची देखील त्यावेळेस वैशालीची ऐपत नव्हती ग्राउंडवर पळताना अनेक वेळा काटेही पायात घुसले मात्र हे कोणाला न सांगता त्यांनी प्रॅक्टिस चालू ठेवली त्यातच भरती निघाल्याचं कळल्यानंतर तिनेही फॉर्म भरला पहिला प्रयत्नात अपयशी ठरली मात्र दुसऱ्या प्रयत्नात ती भरतीत सिलेक्ट झाली या सगळ्या गोष्टीत आपल्या दोन चिमुकलींना देखील ती सांभाळत होती मात्र ज्यावेळेस वैशालीने आपल्या अंगावर वर्दी चढवली त्यावेळेस सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून वाऱ्यासारखा निघून गेला आणि त्यानंतर त्यांनी निश्चय केला तो म्हणजे आपल्याही दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करायचं आपली नोकरी सांभाळत बीड जिल्ह्यात बीड शहरात एकट राहत नोकरी आणि मुलींचे शिक्षण या दोन्हीही जबाबदाऱ्या उत्तम पिल्ले आहेत यात त्यांची मोठी मुलगी हीच आज ग्रॅज्युएशन पूर्ण झाला आहे तर छोटी मुलगी श्रावणी ही पुण्यात शिक्षण घेत आहे यामध्ये वैशाली यांनी खरंच विधवा पण आल्यानंतर देखील आपण जगू शकतो पुन्हा उभा राहू शकतोस आणि जगात स्वतःला सिद्ध करू शकतो हे दाखवून दिलं आहे आज बीड जिल्ह्यातील पोलीस डिपार्टमेंट मध्ये एक मानाचे स्थान त्यांनी मिळवल आहे.