Home > Max Woman Blog > हे सोपं नाही.कॅन्सरमधून बरी होऊन तिची पोहण्याने नवी सुरुवात होते तेंव्हा ...

हे सोपं नाही.कॅन्सरमधून बरी होऊन तिची पोहण्याने नवी सुरुवात होते तेंव्हा ...

हे सोपं नाही.कॅन्सरमधून बरी होऊन तिची पोहण्याने नवी सुरुवात होते तेंव्हा ...
X


Neeta Chaple यांच्या REAL STORY तुमच्याही अंगावर शहारेआणतील .या रिअल स्टोरीतील अनेक गोष्टी तुमचीही सकारात्मकता वाढवतील ,चला तर मग संपूर्ण लेख शेवट्पर्यंत वाचूया ...

काल ती येऊन पुढे उभी राहिली. मी पोहत होते. पहचाना क्या? मी संभ्रमात पडले. कोण ही? लगेच नही बोलले. इतने जल्दी आप भूल भी गये? अभी उमर हो गयी ना ! आणि बुद्धिवर जोर देतं हा! आप वो कॅन्सर surviver ना. Yes! ती बोलली. मी असं बोलायला नको होतं. याची जाणीव नंतर मला झाली. युअर गुड name plz. ती बोलली मंजुषा. ( मी बोलत होते तर बाजूला माझी गँग होतीच. अनिता, अर्चना, आणि छाया )

मी : मला एवढंच इंग्लिश येतं. बाकी M. A. इंग्लिश मध्ये केलं तो भाग निराळा ) छाया लगेच बोलली तुमचा सेन्स ऑफ हुमर जबरदस्त आहे. तुमचं कॉलेज कोणतं? सुरु झालेत प्रश्न? अग मला शिकण्यात आवड नव्हती त्यात कॉलेजचा काही दोष नाही. विद्यापीठाकडून खेळता यावं म्हणून मी शिकले. Nothing else.

मी एवढ्यासाठी हे लिहिते आहे. तीन आठवड्यापूर्वी तीची आणि माझी भेट ऐरोली स्पोर्ट्स अससोसिएशनच्या 5th फ्लोअर वॉशरूम बाहेर झाली. ती स्विमिन्ग करून आलेली. बाथ घ्यायला बाहेर waiting मध्ये होती आणि मी पोहायला जाण्यासाठी ड्रेसअप करत होते. मावशीने नीट पेहराव चढवून दिला. डोक्यावर टोपी आणि गॉगल घालून मी ही थंड पाण्याने शॉवर घ्यायसाठी तिथे गेले.

मंजुषा : मॅम आप अच्छा स्विमिन्ग करते हो! मेरा बेटा बोल रहा था! वो मॅम देखो अच्छा स्विमिन्ग करती है!

मी : सीख रही हूं! सिखना एक प्रोसेस है!जो मरते दम तक रहेगी.

ती : But ma'am you are an inspiration to all. I am कॅन्सर surviver मग मात्र मी तिच्याकडे रोखून बघितलं. आणि बघत राहिले. वय विचारलं. आपका age? I am 46 yrs. माझ्याडोळ्यासमोर काजवे चमकावे तसे झाले. माझी आई कन्सर पीडित होती. मला आठवल्या तिच्या किमोज, रेडियशन. भयाण वास्तव. अंगावर कांटा आला. मुलासोबत ती ही स्विमिन्गला येते. मी तिला बोलले You are real इन्स्पिरेशन.

"मला काही बोलायचं" हा लेख वाचल्यानंतर बऱ्याचं मैत्रिणींनी मला संपर्क केला. सर्वच खेळाडू होत्या. काही सोबत खेळलेल्या तर काही सिनियर खेळाडू होत्या. खेळ पूर्णपणे सोडून कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त आहेत. त्यात बऱ्यापैकी समस्या ह्या गुडघे दुखणे,कंबर दुखणे,spinal कॉर्ड दुखणे. कितीतरी अनगीनत दुखणी आहेत. आणि कितीतरी मनोरुग्ण आहेत की, बऱ्याचं संधी होत्या परंतु काहीच करू शकलो नाही.

अक्षरशः डिप्रेशन मध्ये आहेत.तुझ्यासारखं वजन उचलायला नाही जमणार. स्विमिन्ग सुद्धा करू शकू की नाही माहीत नाही . परंतु Aqua walk तर अवश्य करू. खरी गरज आहे ती हरवलेला आत्मविश्वास परत आणण्याची. आपणही मैदान गाजवली आहेत. हे विसरून नाही चालणार. आपण राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलो आहोत. जाग्या व्हा.

ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून बरी होऊन. नव्याने आयुष्याची सुरवात स्विमिन्ग ने करते. आणि नोकरी घर सांभाळून खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. माझा पिंडच खेळाडूचा आहे. त्यात विशेष काही नाही. नव्याने कुठल्या गोष्टीची सुरवात करणे त्यात पोहणे. पोहायला काय शक्ती लागते हे पाण्यात पडल्यावर मला कळते आहे. हॅट्स ऑफ तुला. तुझ्या इच्छाशक्तीला. जिथे माणूस सर्व हरतो तिथून नव्याने सुरुवात करणे. हे सोपं नाही.

✒️शब्दनीता 🌹

Updated : 21 May 2023 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top