गर्भवती महिला आणि बाळाच्या लसीकरणाचं महत्व जाणून घ्या
X
1) गर्भधारणेदरम्यान महिलांसाठीच्या लसीकरणाचे महत्त्व :
गरोदर महिलांनी गर्भधारणेदरम्यान लसीकरण केले तर मातेचं लस-प्रतिबंधित आजारांपासून संरक्षण देऊ शकते. तसेच, गरोदरपणात लसीकरण केल्याने गर्भ आणि बाळाचे थेट आईकडून गर्भाला ऍन्टीबॉडी हस्तांतरणाद्वारे संरक्षण होऊ शकते. म्हणूनच प्रसूतीपूर्व या सर्वच लसी खूप महत्वाच्या ठरतात.
लसीकरण का करावे?
गरोदरपणात महिलांना विविध प्रकारे स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये निरोगी जिवनशैली निर्माण करण्यासोबतच संतुलित आणि नियमित आहाराचं सेवन करणे, डॉक्टरांकडून नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे, यासारख्या गोष्टी प्रमुख ठरतात. या नियमितपणामुळे आई आणि बाळ दोघांनाही आजाराच्या संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी गरोदरपणातील लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. गर्भवती महिलांना ही लस आजारपणापासून वाचवू शकते. त्याचबरोबर ही लस गर्भातल्या बाळाचेही संरक्षण करून बाळाच्या शरीरात प्रतिपिंडे(अँटीबॉडीज) पोहोचविण्याचे काम करते. या अँटीबॉडीजमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जन्मानंतरही काही महिने बाळाचे स्वतःचे लसीकरण होईपर्यंत संरक्षण करते. त्यामुळेच गरोदरपणात महिलांचे लसीकरण महत्वाचे असते.
गरोदरपणातील महत्वाच्या लसी :
आजारानुसार आणि शरीरातील बदलांनुसार गरोदरपणात महिलांसाठी अनेक लसी आहेत. पण पुढील तीन लसी गर्भधारणेनंतर आवश्यक आणि सुरक्षित मानल्या जातात. गरोदरपणातील निरोगी आरोग्यासाठी बहुतांश डॉक्टर त्या घेण्याचा सल्ला देतात.
धनुर्वात (TT):
पहिली सर्वात महत्वाची लस म्हणजे टिटॅनस अर्थात धनुर्वाताची लस. ही लस आई, गर्भ तसेच जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने बाळाचे संरक्षण करते. किंवा टीटी इंजेक्शन म्हणजेच धनुर्वात इंजेक्शनचे दोन डोसही यात चालतात. गरोदरपणात साधारण २८ दिवसांच्या अंतराने हे डोस घ्यावेत किंवा टीटी इंजेक्शनचा एक डोस आणि टीडॅपचा एक डोस घेऊ शकतात.
शीतज्वर (इन्फ्लुएांझा) :
शीतज्वर हा सामान्यतः 'फ्लु' म्हणून ओळखला जातो आमि 'इन्फ्लुएंझा' विषाणूमुळे होतो. फ्लुसाठी संरक्षण मिळविण्यासाठी आपल्याला इन्फ्लुएंझा लस घेणं आवश्यक आहे. गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील तीन महिन्यात इन्फ्लुएंझा लस घेण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यातदेखील ही लस घेता येते.
टिटॅनस टॉक्सॉइड लस :
'टिटॅनस' (धनुर्वात) हा एक जीवघेणा आजार असून "क्लोस्ट्रिडियम टेटानी" या जीवाणूमुळे शरीरात पसरतो. एखाद्या उघड्या जखमेतून हा जीवाणू शरीरात प्रवेश करतो. अगदी छोटीशी जखमही या जीवाणूला शरीरात प्रवेशासाठी पुरेशी असते. चावा घेणे, कापणे, जळणे किंवा अल्सर यासारख्या खोल जखमांमधून धनुर्वाताचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या आजारापासून संरक्षण होणे आवश्यक आहे.
२) नवजात बाळाच्या लसीकरणाचं महत्व :
लस कोणते रोग टाळतात? लस तुमच्या मुलाला पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण देतात, ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो; गोवर, ज्यामुळे मेंदूला सूज आणि अंधत्व येऊ शकते; आणि टिटॅनस, ज्यामुळे वेदनादायक स्नायू आकुंचन आणि खाणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, विशेषत: नवजात मुलांमध्ये
बाळ जन्मल्यावर लगेच पोलिओ(Polio), बीसीजी(BCG) आणि हेपाटिटिस-B (Hepatitis- B) अशा तीन लसी दिल्या जातात. बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो. बीसीजी लस(BCG Vaccine) क्षयरोगापासून(tuberculosis) रक्षण करणारी ही लस डाव्या दंडावर देतात. हेपाटिटिस बी ची पहिली लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
बाळासाठी आवश्यक असणारे लसीकरण :
जन्मापासून ते 6 वर्षांपर्यंत, लहान मुलांना दिले जाणारे लसीकरण : हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, रोटावायरस, डिप्थीरिया, टिटॅनस, डांग्या खोकला (पर्ट्युसिस), हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी, पोलिओ, कोविड, फ्लू (इन्फ्लूएंझा), न्यूमोकोकल रोग , गोवर, गालगुंड, रुबेला आणि चिकनपॉक्स (वैरिसेला).