अभिनेत्री हेमांगी कवी च्या पोस्टवर बोलताना यु ट्यूबर हर्षदा स्वकुल म्हणते...
X
अभिनेत्री हेमांगी कवीनं तीच्या फेसबूक वॉलवर 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट लिहिली. आणि ती चर्चेत आली. तिने केलेल्या धाडसाचं कौतुक होत असून, अनेक जण आपली मत मांडत आहे. असचं काही मत सद्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहत असलेल्या महिला पत्रकार आणि यु ट्यूबर हर्षदा स्वकुल यांनी मांडल आहे. हर्षदा यांनी एक फेसबुक पोस्ट नेमकं काय लिहलं आहे, पाहू यात.....
अभिनेत्री हेमांगी कवीनं तीच्या फेसबूक वॉलवर 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट लिहिली. ती खूप व्हायरल झाली. ब्रा घालावी का, घातली तर कशी घालावी, निपल्स दिसणार नाहीत ना, अशा प्रश्नांची उत्तरं अनेक स्त्रिया पुरूषांच्या नजरेतून शोधत असतात. हे तीनं फार धाडसानं, योग्य शब्दांत, नेमकं मांडलंय. त्याखाली आलेल्या काही थुकरट कमेंट्सकडे दुर्लक्ष केल्यास अनेकांनी तीचं म्हणणं खूपच पॉझिटिव्हली घेतलंय. ज्या पुरूषांच्या आणि बायकांच्या संस्काराच्या कमेंट्स आहेत ते मानसिकरित्या १०० वर्ष मागेच आहेत हे त्यांनी पूव्ह केलंय. असो आपण यातली पॉझिटिव्ह साईड बघूया आणि त्यामुळे मला आज हे लिहावसं वाटतंय.
१९९४ ते २००४ या काळात अतिशय प्रसिद्ध झालेली इंग्लीश सिरिअल फ्रेंड्स (FRIENDS). ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की ही ६ मित्र-मैत्रिणींची कथाय. ३ मुली ३ मुलं. या सिरीअलची रोज माझ्या घरात पारायणं सुरू असतात. ज्या गोष्टी २०२१ मध्येही बोलणं "बापरे" कॅटगरीत जातं, त्या गोष्टी टेलिव्हिजन सारख्या माध्यमात १० वर्ष अतिशय सटली, एलिगंटली दाखवूनही आता २० वर्षांचा काळ लोटलाय.
यात अभिनेत्री जेनिफर एनिस्टर, कर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो यांची रेचेल, मोनिका आणि फिबी अशी कॅरेक्टर्स आहेत. या सीरियल मधल्या ७० टक्के सिन्समध्ये तिघींनीही कपडे अत्यंत साधे वापरलेत. कधी ब्रा घातलीये तर कधी नाही. या तिघींनीही १९९४ मध्ये अमेरिकन व्हूअर्सच्या अनेक प्रश्नांचा सामना केला. कारण एकच- यातल्या अनेक सीन्समध्ये या तिघींचेही निपल्स, ब्रा बेल्ट सहजतेनं दिसायचे. अनेक प्रेक्षक त्यांना विचारायचे, "तुमच्या ड्रेस डिझायनर्सनी मुद्दामून तुमच्या ब्रा च्या निपलच्या इथे असलेल्या कापडाला मुद्दामून होल पाडलंय का हो?"
काही म्हणायचे या अभिनेत्री Free the Nipple campaign चा भाग असतील. काही म्हणायचे, रेचेलचं पात्रंच 'स्वार्थी'(Mean) दाखवल्यामुळे तीला असे कपडे दिले असतील. म्हणजे स्त्रिच्या स्वभावाचा आणि कपड्यांचाही संबंध लावला जातो तर..! असो. काही म्हणायचे, "जेनिफर मुद्दामून तीचं वॉर्डरोब कलेक्शनच असं ठेवते". पण त्यानं या शोच्या लोकप्रियतवर काहीही परिणाम झाला नाही. ना या स्त्रियांना त्यांची 'कॅरेक्टर सर्टिफिकेट्स' द्यावी लागली. निपल किंवा ब्रा स्ट्रिप दिसणं हे शो विकलं जाण्याचा USP देखील कधी नव्हता.
अखेरीस काही वर्षांपुर्वी Vogue मासिकाला मुलाखत देताना जेनिफरला हा प्रश्न थेट विचारला गेला. त्यावर तीनं सांगितलं- "मला माहिती नाही असं का बोलतात, मी ब्रा घातलीये, ती अशी दिसते, माझे बूब्स असेच दिसतात आणि I am proud of it"
बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या नजराही "अऱे बापरे" वरून "ओके" वर आल्या. २००४ साली १० सिझन्सनंतर सिरीअल संपली. टेलिव्हजन सारख्या माध्यमात, त्यातही डेली सोप(सिरीअल) मधली प्रॉमिनंट पात्रं अशी बिनधास्त बिदाऊट ब्रा किंवा थेट दिसू शकतील अशा ब्रा वापरून कामं करतायत, हीच मुळात आत्ताही आपल्या प्रेक्षकांसाठी भयंकर क्रांतिकारी, आणि कल्चरल शॉक देणारी गोष्ट असू शकेल. मराठी किंवा हिंदी सीरिअल्समध्ये असणाऱ्या मुख्य पात्रांचं असं काही दिसलं तर प्रेक्षकांच्या कमेंट्स काय असतील? प्रोड्युसर डायरेक्टर्स ही रिस्क घेतील का?
जसं निपल दाखवलं, सिगरेट फुंकली म्हणजेच मी मुक्त विचारांची असं नसतं. तसंच हेमांगीनं इतकी नैसर्गिक गोष्ट मांडूनही जर अनेकांना अरे बापरे कशावर लिहिलंयस असं वाटत असेल, तर आपण स्त्रिला जशी आहे तशी एक्सेप्ट करण्याच्या कुठल्या पातळीवर आहोत याचं आत्मपरिक्षण करायला हवं.
ज्यांना असं लिखाण किंवा बोलणं अश्लील, स्वैराचार वाटतो, त्यांनी कृपया सेक्स एज्युकेशन पुन्हा घेण्याची गरज आङे. कारम ते अर्धवट झालं असण्याची दाट शक्यता आहे. आपल्या शरिराचे काही अवयव नाजूक असतात. बाईचे स्तन, पुरूषांचं पेनीस या गोष्टी प्रोटेक्ट कराव्यात हे सेक्स एज्युकेशनमध्ये लहानपणी सांगितलं जातं. गुड टच बॅड टच काये, हे शिकवलं जातं. जरी स्तन किंवा पेनीस हे शरिराचेच अवयव असले तरी त्याला सहजतेनं कुणीही येऊन हात लावत असेल तर तो स्पर्श चुकीचा आहे हे लहानपणीच आपण मुलांना शिकवतो. पण हे हे पार्ट्स शरीराच्या बाहेर असल्यामुळे ते दिसणार, त्यावर घातलेले कपडे दिसणार, आणि त्यात काहीही गैर नाही, हेही लहान वयातच शिकवलं पाहिजे.
टाईट पँट घालून चालताना चड्डीचा आकार दिसू नये यासाठी मलमलीच्या चड्डया वापरून काहींना स्किन रॅशेस येतात हे सांगायला हवं. वाढत्या वयात योग्य ब्रा घालण्याची गरज का आहे, हे सांगायला हवं. लग्नसमारंभात साडीतनं डोकावणाऱ्या ब्राचा पट्टा समोर उभ्या असलेल्या बाईला दिसायचा अवकाश. तो ब्लाऊजमध्ये पटकन ढकलून "कुणी बघितलं नाही ना," हे चेक करण्यासाठी चौफेर नजर फिरवणारी बाईच असते.
बाईचं शरीर, त्यावर घालायच्या गोष्टी, त्या दर्शनी असाव्यात की नाही याचा संस्कृती,पाश्चिमात्य,फलाणा,ढिमका- असला काहीही संबंध नाहीये. अशा बाता मारणाऱ्यांच्या डोळ्यात नागडेपण असतं. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हेमांगीच्या पोस्टनं अनेकांना लिहितं केलं, व्यक्त व्हायला भाग पाडलं हे नक्की. अशा अभिनेत्री आपल्या मराठीत आहेत याचा अभिमान आहे.
- हर्षदा स्वकुळ (YouTuber)