Home > Max Woman Blog > 'बॉल बघ ना तिचे किंवा बॉल न बोX कसली आहे ही..' अशा मानसिकतेच्या लोकांनी स्तनाचे महत्व काय आहे वाचा..

'बॉल बघ ना तिचे किंवा बॉल न बोX कसली आहे ही..' अशा मानसिकतेच्या लोकांनी स्तनाचे महत्व काय आहे वाचा..

समाजात महिलेच्या स्तनाकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन काही बरा नाही. तुम्हीं अनेकवेळा हा अनुभव घेतला असेल की, एखादी महिला जात असेल तर तिच्या स्तनाकडे अनेक पुरुषांच्या नजरा कशा असतात. इतकंच नाही तर या स् स्तनांविषयी अनेक शब्दप्रयोग देखील आहेत.जस की, एखादी महिला आली की, अरे काय तिचे बॉल आहेत, कसा शेप आहे किंवा अरे कसली आहे ही हिला ना बॉल न बोX….अगदी खेडेगावापासून शहरापर्यंत महिलांच्या स्तनाबाबत असे हे शब्दप्रयोग वापरले जातात. बाईकडे अशा नजरेने बघणाऱ्यांना स्तनाचे महत्व काय हे सांगणारा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांचा हा लेख नक्की वाचा..

बॉल बघ ना तिचे किंवा बॉल न बोX कसली आहे ही.. अशा मानसिकतेच्या लोकांनी स्तनाचे महत्व काय आहे वाचा..
X

लेकराला सहा महिने अंगावर पाजायला हवं नंतर आईचं दुध आणि पुरक आहार असं द्यायला हवं कदाचित ग्रामीण भागात काम करणारी आणि स्वतः दोन मुलींची आई असल्याने हा अनुभव शयर करते. माझी मोठी मुलगी अडीच वर्ष आणि लहानी मुलगी तिन वर्ष अंगावर दुध पिल्या कारण मला दुध भरपुर असायचं वश्याट ,रश्याच्या काळ्या तिळाच्या खसखस घालुन भाज्या असायच्या सिझेरियन मुलबंदी दोन्ही आँपरेशन यामुळे माझ्या पोरींचा बाप मला पाण्याने भरलेली गुंडी पण उचलू देत नसं यामुळे धमाधमा दुध यायच मोठ्या पोरीच्या येळस लय हाल झाले होते माझे गावाकडं होतो रहायला. ती फक्त बाळवत्यात असायची साबण सोडा अन डेटाँल असायचं बाळवते धुयला पण रात्री ती जेव्हा उठायची बाळवत्यात लगवी केली की गार लागायचं अन तिच्या उठण्याने पार झोपीचं खोबर होयचं.कारण तेव्हा तिच्यासाठी डायपर वापरण्याईतपत हायसत नव्हती आमची.तवा समजलं होतं की,माय तळहाताचा पाळणा अन "नेत्राचा दिवा"करत असती ते नेमकं हेच

साडेपाच महिने डोस घेणं,बीसीजी(जन्मतः)पोलीओ बुस्टर असं बरच बुस्टर डोस मांड्यातले देले की,लेक तापीनं फनफनायची.अंगावरच सुद्ध पिताना सुसु करायची सिस्टर सांगायच्या बर्फानं चोळायला पण कशाच फ्रिज अन कशाचं काय गारीगारवाला आला की एक गारीगार घेऊन त्या गारीगारनं मी मांड्या शेकायची.

नव महिन्यापर्यांत लेकराला अंगावर पाजयाला आईला एवढा त्रास होत नाही जर लेकराला डायपर आणि आईला आहारासहीत आराम असेल तर या काळात आईला प्रचंड दुध येतं पान्हा वेळोवेळी येत असतो.ते दुध पाजावचं लागतं नाही तर मग छातीत त्या दुधाच्या गाठी बनुन त्या रक्त पु च्या होतात ह्यालाच गावाकडं आमच्या लेकराची टाळु लागलुई म्हणतेत.

आईच्या दुधात साखर असते हे जर पाजलं गेलं नाही तर ती साखर छातीत विरघळुन छातीचा कँन्सर होण्याची शक्यता असतीया म्हणं ! (आता काही ठिकाणी मदर मिल्क बँकामुळे असं दुध वाया जात नाही )

लेकराला अंगावर पाजताना आमच्याकडं दोन्ही आम्मे (स्तन)एक अनाचं अन पाण्याचं म्हजी डावं पाण्याचं अन ऊजवं अनाचं असतयं असा मनवा असल्यानं बाया उजव्या छातीला जास्त पाजत अन डाव्या छातीचं दुध राखावर नाही तर कपड्यावर पिळायच्या.पण मी दोन्ही छातीला पोरींना पाजलं. बाळंतपणात जवा जवा लेकराला पाजताना पान्हा फुटायचा तवा छाती ताईट होऊन निट धारा पळायच्या असं म्हणतेत बत्तीस धारा बोंडशीतुन (निप्पल ) निघत असतात दुधानं ह्या छात्या तटतटल्या की, दुखनं येतं लेकुरवाळीला ह्याच्यामुळं लेकरांना अंगावर पाजलं पाहीजे.

नव महिने लेकराला झालं की,की लेकराला दातं यायला सुरवात होते कधी अगोदर कधी ऊशीराही येतेत हे दातं यायले की लेकराला संडास लागते कारण हे लेकरं रांगतानं चलतानं भोईला जे पडन ते खात रहातात त्यात ते सुळे दातं यायले की लेकराची अन माईची लय बेजारी होत असते कारण लेकराचे दातं सळसळ करतेत अन लेकरू दुध पेतापेताच बोंडशी दातात धरलं की चावतं यामुळं बोंडश्यांना करकुंडे पडतेत.ह्याचा जास्त त्रास बाईला होतु हा अनुभव मला वाटतं अंगावर दुध पाजणार्या मातेला होतो.यामुळे लेकरांना दात निघल्या नंतर आईनं दुध पाजतानं दोन बोटाच्या चिमटीत बोंडशी धरून दुध पाजलं पाहिजे लेकराला (जास्तीत जास्त दिडवर्ष) पेतं लेकरू तोडताना पण लय त्रास होतुया दुध अर्थात अंगावरचा पान्हा आटणं म्हंजी सोपं नसतय हळुहळू तोडावं लागतं लेकरू.पेतं तोडताना बोंडशाभवती लिंबाचा पाला चुरगाळून लावणं,राख लावणं थुका लावणं असं गावाकडं महिला करतात (काही लेकरं छाती पुसुन का होईना पण पितातच) कारण असं म्हणतेत की,दिड दोन वर्षानंतर अंगावरचं दुध जास्त घट्ट गुळमट असं लागतं अन लेकर यामुळं जास्तच चिटीतेत म्हणुन असे पेते लेकरं तुटताना तरास होतोच बाईला यासाठी असे लेकरं कुणाकडं तरी दोन तिन दिवस पाठवुन द्यायचे तिनचार दिवस साठलेलं दूध नंतर आपसुक आटतं आन पान्हा बंद होतो.पण ती दुध आटण्याची जी घडी असते ना त्याबद्दल भावना दाटुन येतात कारण ती प्रक्रीया आपल्या आयुष्यभरासाठी कायमची बंद होते(कुटुंब नियोजन केलं तर)

लेकराचा जन्म झाल्याबरोबर त्याला छातीला लावण्यापासुन त्याला छातीपसुन तोडण्याचा हा प्रवास करताना महिला शारिरीक मानसिकरित्या स्ट्राँग असाव्यात

(बाकी बाईच्या स्तनांकडं बुब्बस म्हणुन बघणार्यांना या स्तनांचं महत्व कळावं)

Updated : 5 Jun 2022 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top