महिलांनी स्वतःला स्पेस देत कामाचं नियोजन कसं करावं?
X
कोविड महामारीने सर्वसामान्यांच्या शरीरावर आघात केला असून आता मानसिकतेवरही यांचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. कोविडमुळे भारतात मानसिक आरोग्याविषयी बोललं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मानसिक आरोग्याविषयी प्रचंड उदासिनता आपल्याला समाजात पाहायला मिळते. महिला घराकामात असो किंवा नोकरी करताना असो तिच्या मानसिकतेला समजून घेण्याचं प्रमाण फार कमी पाहायला मिळते.
कोविड काळात शारीरिक समस्यांसोबत मानसिक समस्याही दृढ झाल्याचं चित्र समाजात पाहायला मिळत आहे. अनेक जण नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, एकलकोंडेपणाच्या गर्तेत अडकले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांच्या (लहानांपासून-वृद्धांपर्यंत, विशेष करून महिला) मानिसक आरोग्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र, मॅक्सवुमन आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने 'जनजागृती मानसिक आरोग्याची' या विशेष कार्यक्रमातून करणार आहोत.
महिलांनी कामासोबत स्वतःला स्ट्रेस फ्री कसं ठेवावं? महिलांनी स्वतःला स्पेस देत कामाचं नियोजन कसं करावं? महिलांनी कामाच्या ओघात स्वतःला कसं ठेवावं तणावमुक्त? यासंदर्भात मानसशास्त्रज्ञ माधुरी तांबे यांच्याशी मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी केलेली बातचीत नक्की पाहा..