Home > Max Woman Blog > उबग आलाय का तुम्हाला उमेदवारांकडून येणाऱ्या मेसेजेस आणि कॉल्सचा? : डॉ साधना पवार

उबग आलाय का तुम्हाला उमेदवारांकडून येणाऱ्या मेसेजेस आणि कॉल्सचा? : डॉ साधना पवार

उबग आलाय का तुम्हाला उमेदवारांकडून येणाऱ्या मेसेजेस आणि कॉल्सचा? :  डॉ साधना पवार
X

आगामी पदवीधर विधानपरीषद निवडणुकांचे पडघम राज्यभर वाजत असताना उमेदवारांकडून मेसेज आणि कॉल करुन पदवीधरांना हैराण केले आहे. या पार्श्वभुमीवर डॉ.साधना पवार यांनी पदवीधरांना लिहलेले अनावृत्त पत्र.....

डियर पदवीधर्स,

विधानपरिषदेची निवडणूक जवळ आलीय. उबग आलाय ना तुम्हाला, सर्वच उमेदवारांकडून सारख्या येणाऱ्या मेसेजेस आणि कॉल्सचा? पण ते तर काय करणार बापुडे? तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी हेच तर मार्ग आहेत ना त्यांना? सारखं आपलं सगळीकडे पोस्टी आणि स्टेट्स, आमच ठरलंय अमक्या तमक्यालाच मत ,अमक्या तमक्या लाच आमदार बनवायचं वगैरे वगैरे.. आपण सारे सुज्ञ मतदार आहोत,

ही निवडणूक वेगळी आहे, ग्रामपंचायतीपासून राज्यात केंद्रात सत्ता असलेले पक्ष ह्या निवडणुकीला इतर निवडणुकी सारखेच स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत,ज्यात आपल्याला फसायचे नाही आहे. का बरं सक्रिय भाग घ्यायचा आपण सर्व पदवीधरानी या निवडणुकीच्या मतदानात?

लेनिननी म्हंटलंय, If you dont interfere in politics ,politics will eventually interfere in your life. आम आदमी पार्टीचे संस्थापक श्री अरविंद केजरीवालांचेही एक वाक्य माझ्या तरी मनावर कायमचं कोरलं गेलं आहे ते म्हणजे,We cannot afford to hate politics now.आपण चांगल्या व्हिजन असणाऱ्या लोकांनी आता राजकारणापासून दूर न राहता राजकारणात शिरलंच पाहिजे,पर्याय निर्माण केलेच पाहिजेत आणि जनतेनेही नवीन पर्यायांना उचलून धरलेच पाहिजे.

प्रस्थापित राजकारणी असे प्रामाणिक पर्याय उभे राहू नयेत या साठी अाटोकाट प्रयत्न करीत असतात,प्रलोभने देत असतात,लोकांना या ना त्या प्रकारे मिंधे करून ठेवत असतात,आपल्याला जात धर्माच्या जोरावर झुंजवत ठेवत असतात, आपल्याच पैशांनी गब्बर होवून आपल्यालाच पाचशे हजार रुपयांची लालुच देवून अक्षरशः आपलं मत विकत घेत असतात. त्यांना लोकशाहीत जनताच सर्वोच्च आहे हे दाखवण्याची अश्या निवडणुका म्हणजे संधी असते.

तुम्ही मत त्यालाच द्या जो राजकारणात काहीतरी हेतू घेवून उतरला असेल,ज्याला लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर विधायक कार्य करण्याची संधी ही राजकारणात आत जाऊनच मिळणार असते,ज्याला लोकांची कणव आहे,ज्याला स्वतःची संस्था वाचवण्यासाठी राजकारणात टिकून राहणं गरजेचं नाही तर राजकारणातून दिल्लीमध्ये जसा कायापालट झाला तसा व्हायला हवा आहे.विचार करा, पटलं तर हा लेख भरपूर शेअर करा आणि डॉ अमोल पवार यांच्यासारखा सच्चा माणूस विधानपरिषदेत पाठवा.तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा, एक डिसेंबरला मत द्यायचंय हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आणि असामान्य राजकीय दृष्टिकोन असणारे नेते डॉ अमोल पवार यांनाच!


आपली नम्र,
डॉ साधना पवार

Updated : 19 Nov 2020 2:58 PM IST
Next Story
Share it
Top