Home > Max Woman Blog > शेतक-याच पोर Forbes च्या यादीत

शेतक-याच पोर Forbes च्या यादीत

आजचं राजू केंद्रे यांचा 'Forbes 30 Under 30' यादीत समावेश झाला असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून सांगितलं. अगदी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बुलढाणा ते लंडन पर्यंतचा त्यांचा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे. सध्या ते चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहेत. 'फोर्ब्स' (Forbes 30 Under 30) च्या निमित्ताने त्यांनी त्यांची आजवरची संघर्षमय कहाणी शेअर केली आहे.

शेतक-याच पोर Forbes च्या यादीत
X

मी राजू केंद्रे सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. २०२२च्या "Forbes 30 Under 30" यादीमध्ये माझा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झालीय. ह्या आठवड्यात यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल. नक्कीच माझ्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या व पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी हि आनंदासोबत मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे.

माझी माय(आई) चौथीत शिक्षण सोडून वयाच्या दहाव्या वर्षी सासरी नांदायला आली, शिकायची ईच्छा असताना शिकू नाही शिकली. माय बाप दोघेही प्राथमिकही न शिकलेले असताना आम्हा दोघा भावांना शिकवायची धडपड केली. भटक्या समाजात शिक्षणाचा तेवढा गंध नसल्याने हा प्रवास तितकासा सोपा नव्हताच. प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत. पुढे वसतिगृह, समाजकल्याण हॉस्टेलच्या सहाय्याने बारावी पर्यंत शिक्षण बुलडाण्याच्या भारत शाळेत घेऊ शकलो.

पुढे कलेक्टर व्हावं म्हणून पुणे गाठलं, त्या काळात कुणी खंबीर मार्गदर्शक नसल्याने खूप चकरा मारून हॉस्टेल नाही मिळालं, कॉलेजेसबद्दल सांगणार फारसं कुणी नव्हतं, फर्ग्युसन सारख्या कॉलेजची तारीख निघून गेली होती. BPO वगैरे काम करायचा प्रयत्न केला पण तिथेही वैदर्भीय भाषेचा टिकाव लागला नाही. अवघ्या काही महिन्यात पुणे सोडावं लागलं. आणि शेवटी पुणे विद्यापीठातली ऍडमिशन मुक्त विद्यापीठात शिफ्ट करावी लागली. आजही क्षमता असतानाही ह्या व्यवस्था व परिस्थितीसमोर संधीला मुकणारी अशी भरपूर लेकरं आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात हायेत. म्हणून संघर्षाच आणि जमिनीवरच्या क्षमतेच प्रतीक असलेल्या 'एकलव्य'च नाव घेऊन प्लॅटफॉर्म तयार करावा वाटला, हे नावही आपसूकच सुचलं. पुढच्या पिढीच्या ठेचा कमी व्हाव्यात; जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी, बहुजन समाजातील युवक कसे घेऊन शकतील हीच त्यामागची मुख्य प्रेरणा-हेतू-उद्देश.

मुक्त विद्यापीठात शिकत असताना मेळघाटात आदिवासी समूहासोबत काम करत असताना नवीन मार्ग सापडला, आणि कलेक्टर व्हायचं स्वप्न जंगलातच गळून पडलं. मागच्या दहा वर्षातला मेळघाटपासून तर लंडनपर्यंतचा हा प्रवास नव्या वळणावर येऊन पोहचलाय. नऊ वर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वतःला ग्राऊंडवर तासत राहिलो. जमिनीवरच्या कामामुळे एक वेगळी हिंमत मिळाली, ह्या मार्केटच्या गर्दीत ठराविक लोकांच्या मक्तेदारीत त्याचे लिमिटेशनही जाणवले. म्हणून लंडनला यावं लागलं. नव्या प्लॅटफॉर्मवर सिद्ध व्हावं लागलं, त्याचीही काहींना अडचण होताना दिसतेय.

धडपडण्याच्या काळातला हा पोरगा काहींना लाईक कॉमेंट पुरता सहन होत होता. चेवनिंग नंतर काहींना हे यश बघवताना दिसत नाहीये; वाईट वाटतं, असो! पण हात जोडून विनंती आहे. चेवनिंग स्कॉलरशिप मिळाल्यापासूनच्या सहा महिन्याच्या प्रवासापेक्षा, त्या अगोदरचा नऊ वर्षाचा प्रवासही बघाल म्हणजे समजेल पोराची मुळ किती खोलवर रुजली आहेत, त्यामुळे हे बीज जेवढं जमिनीत दाबायचा प्रयत्न होईल, तेवढंच ताकदीने ते उभं राहिल.

लंडनला माझा रिसर्च प्रोजेक्ट "भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता" ह्यावर करतोय. डिग्री झाली की लगेच परत येऊन नव्या दमाने काम सुरू करायचं आहे. परत आल्यावर परत एकदा काही महिने ग्राउंडवर पिंजूआजचं राजू केंद्रे यांचा 'Forbes 30 Under 30' यादीत समावेश झाला असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून सांगितलं. अगदी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बुलढाणा ते लंडन पर्यंतचा त्यांचा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे. सध्या ते चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहेत. 'फोर्ब्स' (Forbes 30 Under 30) च्या निमित्ताने त्यांनी त्यांची आजवरची संघर्षमय कहाणी शेअर केली आहे.न काढायचेत. आपल्या सर्वांची मदत लागेल. वेगवेगळ्या महाविद्यालयात, गावागावात 'उच्च शिक्षण' हा विषय घेऊन संवाद साधायचा आहे. ह्या दरम्यान जमिनीवरची परिस्थिती समजून, संस्थात्मक पातळीवर आखणी करून काम करायचंय.

एकलव्यच्या माध्यमातून मागच्या चार वर्षात ३०० पेक्षा जास्त, पहिल्या पिढीतील शिकणारे लेकरं टाटा इन्स्टिटयूट, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांमध्ये शिकताहेत, सोबत काहीजण वेगवेगळ्या फेलोशिप प्रोग्रॅम मध्ये काम करताहेत, भविष्यात शेकडो एकलव्य जागतिक पातळीवरही चमकतील ह्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे!

इथे लंडनमध्येहि मोठा गॅप आहे! बहुतांश शिकायला येणारी इथली भारतीय लेकरं, ज्यांच्या पाच दहा पिढ्या शिकल्या आहेत त्या पार्श्वभूमीतुन येतात. सहाजिकच मला लंडनला येऊन एक आत्मविश्वास, मोठ्या जबाबदारीची जाणीव वेळोवेळी होतेय. तळागाळातुन जागतिक दर्जाची स्कॉलर घडणे शक्य आहे, त्यादृष्टीने कामही सुरूही केलंय. त्यादृष्टीने एकलव्यच्या धर्तीवर एक ग्लोबल मेंटरशीप प्रोग्रॅम तयार करतोय.

फॉर्ब्स एक महत्वाचं निमित्त आहे, शेवटी अशा प्लॅटफॉर्मवर तळागाळातील 'एकलव्य' शोधून सापडत नाही. शेवटी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे "हे समोरचे दृश्य खूप मोहक आहे, इथे रेंगाळावेसे वाटते आहे, मात्र मी नियतीशी करार केला आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे" ह्या प्रक्रियेतील सर्व विद्यार्थी, सहकारी, मार्गदर्शक, मित्र सोबत होते/आहेत. सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास देतो की हे काम अजून ताकदीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे!

'फोर्ब्स'चा हा पुरस्कार सावित्रीमाई, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, कर्मवीर अण्णा, भाऊसाहेब देशमुख, बिरसा मुंडा, जयपालसिंह मुंडा व सर्वच वंचित घटकासाठी आदर्श असलेल्या समाजसुधारकांना व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यास अर्पण करतोय.

THANKS & REGARDS

-

Raju Kendre (Eklavya)

Forbes 30 Under 30

Chevening Scholar, FCDO UK

https://linktr.ee/raju_kendre

Updated : 7 Feb 2022 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top