तुमचं मौन तुमची 'इज्जत' वाचवत असेल किंवा नसेल पण...
X
आज आपण एकविसाव्या शतकात जगत असलो तरी आजही अभ्रूची मर्यादा फक्त स्त्रियांनाच लागू केली जाते. हे वारंवार विविध प्रकरणांमध्ये आपल्याला दिसून येतं. असाच अनुभव बिहारमधील पुर्णिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल कुमार यांना आला आणि तो त्यांनी ट्विटरवर सगळ्यांसोबत शेअरही केला. हा अनुभव शेअर करताना सायबर गुंडगिरी सहन करू नका. तुमचं मौन तुमची 'इज्जत' वाचवत असेल किंवा नसेल पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाडस नक्कीच वाढवते. असं म्हणाले आहेत.
आज संध्याकाळी ऑफिसमध्ये एक गृहस्थ भेटले. त्यांनी अत्यंत व्यथित अवस्थेत सांगितले की, त्यांच्या मुलीच्या माजी प्रियकराने जुन्या व्हिडिओ चॅटचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला आहे. त्याने तो व्हिडिओ त्यांना(मुलीच्या वडिलांना)देखील पाठवला आहे.
ते रडत रडत म्हणाले की आमचे कुटुंब 'असे' कुटुंब नाही. या प्रकरणामुळे आमची अभ्रू जाईल. माझ्यासोबत बसलेल्या पोलिस अधीक्षकांनी त्यांच्याकडून त्या मुलाची माहिती घेतली. तो मुलगा दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. आम्ही त्यांना जलद आणि कठोर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. पण, त्याचवेळी त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली.
मी त्यांना सांगितले की, कोणतेही कुटुंब हे 'तसे' कुटुंब नसते आणि अशी घटना कोणावरही घडू शकते, त्यामुळे सर्वप्रथम अभ्रू गमावण्याची भीती मनातून काढून टाकावी लागेल.
मला आश्चर्य वाटले की अभ्रू ही संपूर्ण संकल्पना किती पितृसत्ताक आहे आणि आदराचा संपूर्ण भार (या प्रकरणात) आरोपीपेक्षा पीडितेवर कसा पडतो. गंमत अशी आहे की पितृसत्ता महिलांसोबत पुरुषांनाही आपला बळी बनवते.
आपल्या मुलीवर होत असलेल्या गुन्ह्याला योग्य प्रतिसाद देण्याऐवजी बाप समाजात मानापमानाच्या बाबतीत बिचारा आणि लाचार दिसत होता. बरं, सायबर गुंडगिरी सहन करू नका. तुमचं मौन तुमची 'इज्जत' वाचवत असेल किंवा नसेल पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाडस नक्कीच वाढवते.