रिया चक्रवतीला जगू द्यायचं नाही, असं माध्यमांनी ठरवलंय का?
X
कालपासून हे फोटो डोक्यात बसलेयत. इतकं घाण वाटतंय की काहीच बोलावं वाटत नाही. कोण तो सुशांत सिंग आपल्या कर्माने मेला पण हिला जिवंत मरण देऊन गेला. हिला आज वाटत असेल की झक मारली आणि प्रेम केलं. अजून गुन्हा सिद्ध नाही, आरोप काय ते माहीत नाही. पण हिला जगू द्यायचं नाही असं ठरवलंय मीडियाने. हिच्या बातम्या असलेल्या लिंकवर लोक हिला वेश्या, कुत्री, आईबापाने संस्कार न केलेली म्हणतात. आमचे मीडियातले काही मित्र म्हणतात की एरवी मीडियातले लोक यांच्या मागेपुढे फोटो काढायला येतात तेव्हा यांना ते छान वाटतं. पोझेस द्यायला मजा येते. पण आता तुम्हाला हे नको. दुटप्पीपणा म्हणे.
हे ही वाचा...
कोरोनाबाधित महिलांच्या यशस्वी प्रसूतीची सेंच्युरी
‘मला आता माझ्या भारत ‘परिवाराची’ चिंता वाटतेय’ : यशोमती ठाकूर
यातही ही मुलगी टिकून आहे याचं मला कौतुक वाटतं. नाहीतर आत्महत्या करायला हिलाही मार्ग मोकळाच आहे. पण हिने आत्महत्या केली तरी तिला सुखाने मरूही देणार नाही आपण. घाणेरड्या राजकारणासाठी एका घराचा बळी दिला जातोय आणि आपली न्यायालयं, महिला आयोग, सगळीच सरकारं आणि आपण मख्खपणे बघत आहोत.
आणि हो, मीडियाने आता पांडुरंग रायकरबद्दल आणि कोरोनाच्या अव्यवस्थेबद्दल बोलणं बंद करावं. आधी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघावं.
बाकी ज्यांना आत्महत्या करायची आहे. त्यांनी यातून शिकायला पाहिजे. एकतर आत्महत्या करणं चुकीचंच आहे. पण मरणारच असाल तर चिठ्ठी लिहून मरा. तसंही मरणारच आहात. पाच मिनिटं उशिरा मेल्याने फरक पडत नाही. दुस-र्याचं जगणं नरक करू नका.