Home > Max Woman Blog > सुंदर व सत्शील दुर्गाबाई !

सुंदर व सत्शील दुर्गाबाई !

मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या रुपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी...!

सुंदर व सत्शील दुर्गाबाई !
X

'अयोध्येचा राजा' या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट 'बोलू' लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात दुर्गा खोटे यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या.१९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दुर्गाबाईंना गौरवण्यात आले.

आपल्या प्रदीर्घ ५० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक आघाडीच्या नायकांसमवेत आधी नायिका व मग आई, आजी अशा भूमिका केल्या व गाजवल्यासुद्धा.२२ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री विजया मेहता या त्यांच्या स्नुषा.सुंदर व आकर्षक चेहरा, उत्तम अभिनय व सत्शील वर्तन यामुळे दुर्गाबाई कायमच स्मरणात राहतील.

Updated : 14 Jan 2021 11:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top