9 युवतीची तिरपुर,तमिलनाडु मधून गावी जाण्यास तारेवरची कसरत
X
दिनांक 29 में 2020 :- सतत 2 वर्षापासून तमिलनाडु मधील तिरपुर जिल्ह्यातील इसीएम गारमेंट कंपनी मध्ये कामावर असलेल्या 9 युवती व त्यांच्यासोबत 3 युवक सोबतीला. त्यापैकी एक युवती सोबत तिचा पती तर दोघी सोबत सख्खे भाऊ होते. हे सगळेजण मध्यप्रदेश मधील बालाघाट, नैनपुर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी.
नुकतेच 20 दिवसा अगोदर गांवावरून येवून कामा वर रुजू झालेल्या. 8-9 हजार मासिक वेतनावर कपडे शिलाईच्या कामावर. कंपनी पासून जवळच 3 किमी अंतरावर किरायाचे घर. नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु होते. अचानक लॉकडावून जाहिर झाले अन् सर्वच चक्र बिघडले.
गावाहून आल्यावर फ़क्त 20 दिवस झाले अन् वेतनही मिळालेले नव्हते, अश्यात काम बंद झाले. नियमित गरजा भागविणेही कठिन झाले. प्रति व्यक्ति 5 किलो तांदूळ व 6 जनांसाठी फ़क्त 1 किलो तेल सरकार तर्फे मिळायचे. 3 महिन्याचे भाडेही थकलेले होते. लवकरात लवकर यातून सुटका व्हावी यासाठी सर्वच प्रयत्नशील.
कोरोनाच्या दहशतिमुळे भीतियुक्त वातावरणाला कंटाळलेले. गावाला जाण्याची उतुंग उत्कण्ठा. स्थानिक पोलिस स्टेशनला संपर्क साधला व पोहोचवुन देण्याची विनंती केली. मात्र प्रत्येक वेळी एकच उत्तर "मध्यप्रदेशला जाण्यासाठी एकही गाड़ी नाही". यावर बसची व्यवस्था केल्यास प्रत्येकी 7500 रुपये खर्च करावे लागतील व त्यासाठी पुन्हा 25 प्रवासी लागतील. आणखी 25 जण जमवायचे तरी कुठून अन् इतके पैसे आणायचे कुठून ? हा एक प्रश्नच होता. सामाजिक संस्था, पोलिस, शासन आदि कड़े मदत मागुनही मिळत नव्हती.
निराशाच हाती आली. अश्यात कोणीतरी सांगितले की बिहारसाठी एक गाड़ी जात आहे. निश्चय केला ही गाड़ी पकडायचीच. भराभर भरल्या बॅगा अन् तसेच निघालो रेल्वे स्टेशन कड़े. एकच ध्यास, कसेही करुन ही गाड़ी पकडायची. वाटेत ऑटो पकडला अन् पोहोचलो एकदाचे स्टेशनला. रे
ल्वे पोलिस कर्मचारी कड़े विचारपुस केली. तो म्हणाला "यह गाड़ी बिहार के लिए है, मध्यप्रदेश नहीं जा रही है ।" . त्या युवतीनी विनंती केली की "यह गाड़ी नागपुर होते हुए जा रही है, तो हम नागपुरमें उतर जायेंगे और वंहासे मध्यप्रदेशमे अपने गांव चले जायेंगे।". रेल्वे पोलिस कर्मचारी मानेना, अडला आपल्या नियमावर. नियमाच्या बाहेर कसा जाणार ? यांच्याकडे आपली दाळ गलत नाही, हे पाहून स्थलांतरित मजुरांना रेल्वे पास वाटप करीत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याकड़े मोर्चा वळविला. व त्यांना आपबीती सांगितली.
मुलींच्या अडचणी त्यांना समजल्या. तिरपुर-दरभन्गा यात्रिक गाड़ीत बिहारमध्ये जाणाऱ्या मजुरांना ते प्रवासी पास देत होते. सर्वांना पास वाटून झाल्यावर उरलेल्या पासेस हया मिळाल्या. एकदाचे बसलो गाडीत. मजल दर मजल करीत गाडी पोहोचली एकदाची नागपुरला.
गांव जवळ आल्याचा आम्हाला असीम आनंद. रात्री 9.30 वाजाता गाड़ी नागपुर रेल्वे स्टेशनवर आली अन् आम्ही सामान उतरवू लागलो. तेवढ़यात पोलिस धावले अन् म्हणू लागले "अरे, यंहा कहां उतर रहे हो ? गाड़ी बिहार जा रही है । आप लोग यंहा नहीं उतर सकते है ।"
यावर मूली म्हणाल्या "हमें मध्यप्रदेश की बालाघाट जिल्हा जाना है इसलिए नागपुर उतरना है ।" पोलिस कर्मचारी धमकावू लागले की "आपकी रेल्वे पास बिहार की है । बिच में किसीभी स्टेशन पर किसी को भी उतरने की इजाजत नहीं है । अपनी गाड़ी में चङो वर्ना डंडे पड़ेंगे ।" आम्ही समजावून संगण्याचा प्रयत्न केला. पोलिस आम्हाला गाडीत ढ़कलत होते आम्ही उतरत होतो. यावर चिडून पोलिसांनी तीन युवकांना दंडयानी झोड़पले.
या धाकाने 3 मूली सामान घेवून पुन्हा गाडीत चढल्या. पण आम्ही चंग बांधला होता की कांहिहि होवो, गाडीत चढ़ायचे नाही. गाड़ी सुटायची वेळ आली, सिटी वाजली तशी हृदयात धड़धड़ वाढली.
पोलिसांना न जुमानता पूर्ण ताकतीनीशी तीनही मुलींना सामानासह ख़ाली उतरविले. हृदयाचा ठोका चुकला अन् गाड़ी सुटली. अखेरचा निश्वास सोडला. पोलिस रागाने बघत होते. आम्हीही निडर होवून त्यांच्याकडे बघत होतो. स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी मुख्य दरवाजातुन न जाता पोलिसांची नजर चुकवित मालवाहक गेट मधुन बाहेर पडलो. रात्रीचे 10.30 वाजले होते.
हे ही वाचा
….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले
कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न
22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात…
बाहेर सर्वत्र शुकशुकाट. फळाची दुकाने, होटल्स, खानावळ सर्वांना कुलुपे, काळोखच काळोख, भयान शांतता. माणसे नाही, गाड्या नाही, ऑटो नाही, वर्दळ नाही, कुली नाही, भिकारी नाही, कुणाचाही आवाज नाही, बाहेर सगळीकडे दूरवर अंधारही अंधार. मनात भितीचा गोळा बेचैन करीत होता. 20 तासांच्या रेल्वे प्रवासात कांहिहि खायला न मिळालेले आम्ही सगळेजण भुकेने व्याकुळ झालेले.
अंधारात बाहेर पडण्याची भीती. सुरक्षितता म्हणून रेल्वेच्या मुख्य दरवज्याकडे वळलो. अंधाराला खाणारा तेवढाच एक प्रकाश. सगळेच अन्नाच्या शोधात मात्र हाती निराशाच निराशा । पोलिस दादाला विचारले "कांही खायला दया". त्यांनी एक बिस्किट पुडा व पाणी बॉटल दिली. 12 जणांनी एक एक बिस्किट सोबत घुटभर पाणी गिळले. स्टेशनच्या आंत जाण्यास मनाई. त्यामुळे पोर्च मध्ये राहन्याशिवाय पर्याय नाही. अक्षरशः जागुन काढली ती काळोखी रात्र. एकदाचा दिवस उजाडला. बालाघाट, नैनपुरला जाण्यासाठी गाड़ीचा शोध सुरु झाला.
शोधूनही कुणीच मिळेना. एक मिळाला तर एका गाडीचे भाड़े रु 15 हजार मागीत होता. एवढा पैसा आनायचा कुठून ? कांहीच सुचेना. कुणीतरी एका व्यक्तिने सचिन लोनकर यांचा मोबाईल नम्बर दिला. व सांगितले की "यह आदमी आपको मदद करेगा ।" चला आशेचा किरण लागला. आणि त्यान्ना फोन लावला. फोनवरच माहिती दिली. व ते न चुकता भेटीला आलेही. सर्व कहानी ऐकल्यावर त्यान्नी गंतव्य ठिकाणी सोडून देण्यास होकार दिला. मात्र गाडीत डिजेल भरावे लागेल, या अटीवर. तसेच मेडिकल तपासणी व पोलिस परमिशन घ्यावी लागेल, त्याला थोडा अवधी लागेल, असे ते म्हणाले. रेल्वे स्टेशन वर जेवनाची कसलीच व्यवस्था नसल्यामुळे शहराच्या बाहेर 15 किमी वर पारडी नाक्यावर गणेश साहू व गजु रहांगडाले यांनी चालविलेल्या अन्नसत्रच्या ठिकाणी आम्ही ऑटोंने पोहोचलो व ते स्वतः पोलिस परवानगीसाठी कामाला गेले. दोन दिवसापासून उपाशी असलेल्या पोटाला येथेच्छ जेवण मिळाले.
सचिन लोनकर यांनी ही गोष्ट नागपुर शहरचे पोलिस उपायुक्त श्री नीलेश भरने यांना संगीतल्यावर लगेच परमिशन दिली व जाण्याचा मार्ग मोकळा केला. दुपारी 4 वाजता प्रत्येकी 6 जणांना घेवून दोन गाड़या बालाघाटकड़े निघाल्या. रस्त्यातच बय्यर विधानसभा क्षेत्रचे विधायक श्री संजय उइके यांच्याशी फोनवर संपर्क साधुन 12 जणांना बालाघाट येथे घेवून येत असल्याचे सांगितले. हे सगळे जण बालाघाट व नैनपुर जिल्हयातील वेगवेगळ्या गावातील असल्यामुळे त्यांना त्यांच्या गावात सोडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
रात्री 8 वाजता बालाघाटला पोहोचलो तेव्हा झिमझिम पाऊस सुरु होता. रस्त्यावर चिट पाखरूही नव्हते. बालाघाट नगरपरिषदचे अध्यक्ष यांनी रात्री पर्यंत क़ोरनटाइन सेंटर मध्ये ठेवू व दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येकाला त्यांच्या गावात सोडून देवू असे सांगितले. त्यानुसार सचीन लोनकर अन् दूसरी गाड़ीवाला हे परतीच्या प्रवासाला लागले व आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला सुखरूप पोहोचलो.
लॉकडावुनच्या काळात अख्खी व्यवस्था कोलमडुन पड़लेली होती. सरकारी कर्मचारी नियमांचे काटेकोर पालन करीत असतांना कोणी कितीही अडचणीत असतील तरी त्याची कसलीही दखल न घेता त्यावर काय उपाय शोधता येइल, याचा जरासाही विचार करीत नव्हते. नागपुर रेल्वे स्टेशन वरील रेल्वे पोलिसांची वागणूक किती निष्ठुर होती ? याचा विचार करावा.
डंडयाने मार खान्याच्या धाकाने धास्तावलेल्या त्या तीन मूली गाडीत बिहारला पोहोचल्या असत्या तर काय विपरीत घडले असते ? याचा विचारही करता करायला नको. ही निष्ठुरता महिलांसाठी तरी कमी झाली नाही वा कुठे द्रवली नाही, याचे वाइट वाटते.
दीनानाथ वाघमारे, संघर्ष वाहिनी, नागपुर, मोब.9370772752, 9822120161