१ लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा
X
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात. तर त्यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आहेत. ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आणि आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम चालवले जातात. त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषतः शिक्षण, आरोग्य, आणि क्रीडा क्षेत्रात. रिलायन्स फाऊंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, नीता अंबानी यांनी एक मोठा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे देशातील महिला, लहान मुले यांना मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे अनेक समुदायांना लाभ होईल आणि सामाजिक समानता साधण्यात मदत होईल.
रिलायन्स फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे लहान मुले, किशोरवयीन आणि महिलांसाठी मोफत चाचणी आणि उपचार सुविधा पुरविल्या जातील. सर एच. एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त नीता अंबानी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी एक लाखाहून अधिक महिलांना मोफत चाचणी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.
सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त उपेक्षित समाजातील मुलांसाठी एक नवीन आरोग्य सेवा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनेक महत्त्वाच्या सेवांचा समावेश केला जात आहे.
- जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त 50,000 बालकांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.
- 50,000 महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहे.
- 10,000 तरुण किशोरवयीन मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लसीकरण केले जाणार आहे.