रूपाली ठोंबरे राजकारणात येण्यापाठीमागे काय कारण होतं?
X
आपल्या डॅशिंग स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील या राजकारणात येण्यापाठीमागे काही कारणं होती. राजकीय पार्शवभूमी नसलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला मात्र त्यांना परिस्थितीन राजकारणात येण्यास भाग पाडलं. रूपाली ठोंबरे-पाटील यांच्यासोबत अशी कोणता घटना घडली की ज्यामुळे त्यांना राजकारणात येणं भाग पडलं? हा संपूर्ण किस्सा रूपाली ठोंबरे-पाटील यांनीच MaxWoman आयोजित मॅक्स MaxWoman Conclave मध्ये सांगितला आहे. तेच जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत वाचा..
रूपाली ठोंबरे म्हटलं की तो त्यांचा डॅशिंग स्वभाव, बेधडक बोलणं हे आपल्या लगेच डोळ्यासमोर उभे राहते. पण त्या लहानपणापासूनच अशा डॅशिंग आणि बेधडक आहेत का? तर अजिबात नाही त्या लहानपणी खूप लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावाची होत्या. पण त्यांना परिस्थितीने आक्रमक बनवलं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर पुढे काय होईल? या भीतीने मोठ्या बहिणीचं निधन झालं. मात्र अशा दुःखद प्रसंगी कुणीही सोबत आलं नाही. त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे, हे त्यांनी स्वतःला सांगितलं.
त्यावेळी एकीकडे हे सगळं दुःख पचवत बीडमध्ये हॉलीबॉल स्पर्धेसाठी नॅशनल खेळाडू म्हणून रूपाली ठोंबरे यांचे सिलेक्शन झालं होतं. या स्पर्धेला रूपाली ठोंबरे गेल्या त्यावेळी त्यांच्यासोबत एक घटना घडली एक उत्कृष्ट खेळाडू असून देखील त्यांना खेळात सहभाग घेता आला नाही याचं कारण होतं एक राजकीय व्यक्ती.. एका राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे रूपाली ठोंबरे पाटील यांचं नाव खोडून त्या ठिकाणी त्या राजकीय व्यक्तीच्या संबंधित व्यक्तीचं नाव टाकण्यात आलं. अर्थात रूपाली ठोंबरेंना त्यावेळी सिलेक्शन होऊन देखील ती स्पर्धा खेळता आली नाही. हा त्यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का होता. अशा परिस्थितीत त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे आज हे माझ्यासोबत घडलं यावेळी माझ्या पाठीमागे उभारण्यासाठी कोणीही नाही, उद्या हे कोणासोबतही घडू शकतात. मात्र दुसऱ्यांसाठी कुणीतरी असायला हवं. नाहीतर असा अन्याय होत राहील, याच भावनेतून रुपाली ठोंबरे यांनी आक्रमकपणा स्वीकारला आणि त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला..
पुढे 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर खळखट्याक आंदोलन केली. त्यावेळी त्यांच्या घरात सगळे वकील असताना देखील तीन महिने त्यांना फरार व्हावं लागलं. तसेच या फरार असलेल्या काळात रुपाली ठोंबरे नेमक्या कशा राहिल्या? तुम्हाला रूपाली ठोंबरे यांच्या आयुष्यातील अशा कधीही समोर न आलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर MaxWoman च्या Facebook आणि Youtube पेजला नक्की भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा संपूर्ण प्रवास पहावयास मिळेल.
संपूर्ण कार्यक्रमाचे विडिओ पाहा ...