पांडुरंगा तुझी कच्ची बच्ची मागे ठेऊन ‘डेड लाईन’च गाठलीस रे!!!
X
डोळे उघडून नीट पहा काय दिसतंय समोर तुला??
डेड लाईन डेड लाईन आणि फक्त डेड लाईन.... पाच ची, सहा ची, की सात ची??
तुझ्या नसण्याची ब्रेकिंग ऐकल्या पासून माझं अक्षरशः ह्रदय पिळवटून येतंय
खर सांगते खुप गैरसमज होते माझे बूम घेऊन अहोरात्र बातम्यांचा पाठलाग करणाऱ्या जमाती बद्दल. फारसं काही माहीतच नव्हतं तुमच्या बद्दल. परग्रहावरचीच ॲटिट्यूड वाली जमात वाटायची ही. पण महाराष्ट्र प्रदेश ची प्रवक्ता झाले साधारणतः सात वर्षापूर्वी आणि मग ही हाडामासा ची माणसे काय काय दिव्यातून जातात हे अगदी जवळून पाहीलं. या क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा त्या साठी जीवाची बाजी लावणारे असंख्य पत्रकार. प्रिंट मीडियात ही तेच आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये पण तेच.
लोकशाहीचा चवथा स्तंभ हा. त्याच्या पाया खालची खुर्चीच काढून घेतलीय आपण आणि तो लटकतोय फासावर रोजचाच.
मुंबई ला टॉक शो च्या निम्मीताने सतत जायला लागले. किती लोक भेटेल संजय आवटे, आशिष जाधव, रवि आंबेकर, निखील वागळे, अजित चव्हाण, प्रसाद काथे, गिरीश निकम, निखीला, महेश म्हात्रे, मंदार फणसे,राजेंद्र हूंजे,मिलींद भागवत, विशाल परदेशी, उदय निरगुडकर, ज्ञानदा, नम्रता, प्रसन्ना खुप मोठी लिस्ट आहे. सगळे प्रचंड मेहनत करणारे स्डडिओ च्या गोगांटात कसलाही ताण न जाणवू देता सतत ब्रेकिंग चा रतीब घालणारे. तर स्डडिओ बाहेर फिल्ड वर ब्रेकिंगसाठी चे मटेरियल गोळा करणारी दूसरी टीम कॅमेरामन आणि बातमीदार यांची एक कोअर टीम. काही लोकांना पूर्ण जिल्हा कव्हर करायचा असतो अगदी बातमी च्या मागे सुसाट पळायचे त्यात परत आपल्याच चॅनेल ला ही बातमी दाखविल्याची वेगळी न्यूज. कोविड चा विळखा... तुटपुंजा पगार आणि प्रचंड वेगाने धावणे.. कोण कुठली गांजाडी रिया आणि ती चे दोस्त पण ती घरातून बाहेर पडतानाचे एस्लूक्यूजिव्ह दाखवायला सकाळी सात पासून भर पावसात फुटपाथ वर गर्दी करायची. ती बाई एक वाजता घरा बाहेर पडणार मग तीच्या गाडीच्या बाहेर जीवाच्या आकांताने रिया मॅम एक मिनीट म्हणत पळायचे....
नाशिक मध्ये मी पहाते मुकूल, आकाश,चंदन, विठ्ठल, योगेश खरे,रवि बागूल, बाग, कपिल, प्रांजल, वैद्य, किती तरी जण या डेड लाईन च्या मागे धावतात.
एका in between line बातमी साठी ची तासन तासा ची प्रतीक्षा ...
पांडूरंग आज तुझा नंबर लागला .मी अनेक वर्षांपासून तुला ओळखते. एखादा टॉक शो चांगला झाला की हमखास येणारा तुझा फोन. मॅम मस्त बोलल्यात. ओरडून बोलायची खरंच गरज नसते म्हणून मिळणारे तुझे कॉम्लिमेंट. लोकांच्या प्रश्नां साठी बूम घेऊन पळणारा तु तुझ्या वर वेळ आली तेंव्हा एक अॅम्बूलन्स पण तुझ्या साठी महाग झाली. ब्रेकिंग द्यायच्या नादात अक्षरशः तु डेड लाईनच गाठलीस मागे ठेऊन तुझी कच्ची बच्ची.
खरं सांग आज पंधरा सेकंदा च्या बातमी मधील तुझी घेतलेली दखल हेच मेडल मिरवायचे का तुझ्या परिवाराने...
- डॉ हेमलता पाटील
लेखीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्त्या आहेत.