Home > Max Woman Talk > "स्रियांच्या अधिकारासाठी सत्याग्रह करणं काळाची गरज"

"स्रियांच्या अधिकारासाठी सत्याग्रह करणं काळाची गरज"

चवदार तळ्याच्या सत्याग्रहात महिलांचे योगदान नेमकं काय होतं? आणि आजच्या परिस्थितीत महिला कुठे आहे? सांगतायेत adv. अनारिया हिवराळे... पाहा हा व्हिडिओ

स्रियांच्या अधिकारासाठी सत्याग्रह करणं काळाची गरज
X

आज महाड चवदार तळे सत्याग्रहाचा ९४ वा वर्धापन दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना त्यांचा हक्क, स्वाभिमान आणि समाजात समतेचा संगर निर्माण करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहात डॉ. आंबेडकरांसोबत अस्पृश्य समाजातील पुरुषांसोबत स्रियाही त्याच ताकदीने उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी सवर्णाकडून झालेल्या लाठीमार, दगडफेकीत स्त्रियांचा ही समावेश होता. अस्पृश्यांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी स्रियांचेही मोठे योगदान आहे.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहानिमित्त आजची महिलांची सद्यस्थिती मांडताना Adv. अनारिया हिवराळे म्हणतात की, ग्रामीण भागात आजही महिलांना पाण्यासाठी वणवण हिंडाव लागते. डोक्यावर हंडा घेऊन मैलोनमैली त्यांना पायपीट करावी लागत असे. गावपातळीवरील चित्र पाहिलं तर गावातील महिलाच मोठ्या संख्येनं पाणी भरताना पाहावयास मिळते. पुरुषांनीही आपलं कर्तव्य ओळखून महिलांना आधार दिला पाहिजे. मात्र प्रत्यक्षात फार क्वचित असं पाहायला मिळते.

अनारिया सांगतात की, अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला तसा सध्याच्या काळात महिलांनी आपला हक्क, स्वाभिमान आणि अधिकारांसाठी सत्याग्रह केला पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांनीही त्यांना ताकदीने उभे राहण्यास पाठिंबा दिला पाहिजे.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहात महिलांचे योगदान नेमकं काय होतं? आणि आजच्या परिस्थितीत महिला कुठे आहे? सांगतायेत adv. अनारिया हिवराळे...

पाहा हा व्हिडिओ..


Updated : 1 April 2021 12:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top