सरकारने आपला माज सोडावा आणि शेतकऱ्यांसमोर यावं - उल्का महाजन
X
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता देशभरातून लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी "सरकारने आपला माज सोडावा आणि शेतकऱ्यांसमोर यावं" असं ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन यांनी म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या की, "देशातील केंद्र सरकार ज्या पध्दतीचे कायदे करतंय यातून ते सामान्य माणसाच्या नाहीतर उद्योजक आणि भांडवलदारांच्या बाजूने असल्याचा स्पष्ट संदेश देतात. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना सांगू इच्छितो तुम्ही स्वत:ला जनतेचे सेवक म्हणवता तर सेवक म्हणून समोर या. जनतेचे मालक असल्यासारखं शेतकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याचा मारा करुन त्यांची मुस्कटबादी करणं थांबलं पाहिजे."
"देशाचा अन्नदाता आज संकटात आहे. हे आम्ही खपवुन घेणार नाही. देशातील जी काही संवेदनशील आणि संवेदन प्रेमी जनता आहे त्या जनतेने त्या सर्वांनी शेतकऱ्यांबरोबर उभं राहिलं जाहिजे. आता सरकारने आपल्या माज सोडावा आणि अन्नदात्यासमोर न्यायाच्या भुमिकेतून समोर यावं." असं उल्का महाजन यांनी म्हटलं आहे.