शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन आणि त्यावेळी घडलेला किस्सा.. । Rahi Bhide
X
शरद पवार गाडीतून पुण्याला एका पत्रकार परिषदेसाठी निघाले होते. त्याचवेळी गाडीत असताना त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं होतं आणि कालांतराने खरोखरच शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. नक्की हा फोन काय होता? यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात नक्की काय संभाषण झालं? हे जाणून घ्यायचं असेल तर ही माहिती संपूर्ण वाचा...
राजकीय पत्रकारिता करत असताना पत्रकाराला अनेक नवनवीन अनुभव येत असतात हे अनुभव सर्वसामान्य लोकांना फार औत्सुक्याचे वाटत असतात. म्हटलं जातं पत्रकाराला बातमीच्या पलीकडचं माहीत असतं म्हणजे एखाद्या विषयी संपूर्ण माहिती पत्रकारांकडे असते. अगदी त्याची खाजगी माहिती देखील त्यांना विचारली तर ते आपसूक सांगतात. त्यात राजकीय पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांकडे तर असे अनेक भन्नाट अनुभव असतात. असाच एक अनुभव पत्रकार राही भिडे यांनी शेअर केला आहे. तो किस्सा आहे शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा. शरद पवार एका पत्रकार परिषदेसाठी पुण्याला निघाले होते आणि यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये पत्रकार राही भिडे यादेखील उपस्थित होत्या. गाडीत जात असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू होती. कारण शरद पवार यांना वेगवेगळ्या गोष्टींवर नेहमी चर्चा करायला आवडते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड वाचन आहे. त्यामुळे ते पत्रकारांसोबत नेहमीच संवाद साधतात. अशाच प्रकारचं बोलणं गाडीमध्ये राही भिडे आणि शरद पवार यांच्यात सुरू होतं. तेवढ्यात शरद पवार यांचा फोन वाजला आणि तो फोन होता उद्धव ठाकरे यांचा.. शरद पवारांनी फोन उचलला आणि तो लाऊड स्पीकर वरती ठेवला. ज्या मार्गावरून शरद पवार प्रवास करत होते अगदी त्यांच्याच ताफ्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा चाफा होता. शरद पवारांची गाडी पुढे पाहतात त्यांनी शरद पवारांना फोन केला होता. यावेळी त्यांनी फोनवर शरद पवारांना ''साहेब मी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका अजिबात'' असं म्हंटले..
त्यानंतर थोडं बोलणं झालं आणि शरद पवारांनी फोन ठेवला. अगदी काहीच अंतर पार केल्यानंतर शरद पवारांना पुण्याला जायचं होतं तर उद्धव ठाकरे सरळ निघाले होते. त्यामुळे शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा हळू झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा पुढे गेला. उद्धव ठाकरे यांची गाडी पुढे गेल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि '' उद्धव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'' असं म्हटले आणि शरद पवारांनी हे खरं करून दाखवलं ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.. बाकी राही भिडे यांनी सांगितलेला हा शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही MaxWoman च्या फेसबुक आणि युट्युब पेजला नक्की भेट द्या...