वारसा केवळ मुलं चालवु शकतात हा गैरसमजात बदलवणाऱ्या उद्योगिनी
X
काटदरे- नाही इतकं सोपं नाहीये ते वाटतं खूप सोपं आहे पण actually नाही आहे सोपं कारण माझ्यासाठीचा हा प्रवास खूप कठीण होता. आज इथपर्यंत येण्याचा गेली तेरा चौदा वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे. माझं माहेर आणि तिथं मला व्यवसायाची तशी माहिती होती कारण आंबा उत्पादन आहे आमच्या घरी त्याच्यामुळे मी लग्न होऊन इथं आल्यानंतर इथलाही व्यवसाय मसाल्याचा बघायचा आहे हे मला पूर्ण माहिती होतं पण ज्यावेळेला actually मी याच्यामध्ये आले आणि काम करायला सुरूवात केली तेव्हा माझ्यासमोर खूप अडचणी आल्या कारण मला याच्यातलं काहीच माहित नव्हतं माझं असं झालं होतं की maximum सगळं बाहेरची कामं तुम्ही करा आणि घरातलं काम सगळं त्याच्यामुळेला या घरातल्या कामाविषयी मला फारसं काही माहित नव्हतं.म्हणजे थोडक्यात kitchen सांभाळणं हे माझ्यासाठी खूप अवघड विषय होता. आणि तशी मी आमच्या कारखान्यामध्ये बघायला लागले. तशा मला खूप अडचणी यायला लागल्या. सासूबाई मला सगळं शिकवायच्या की production तुला बघायचं आहे. तर प्रत्येक मसाल्यामधल्या काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकवायच्या. पण मुळातच त्याची फारशी आवड नसल्यामुळं ते शिकून घ्यायला खूप मला अवघड जात होतं.
प्रियदर्शिनी हिंगे -नवीन लग्न झालं की बर्याचदा हे गृहीत धरलेलं असतं की आपल्या घरातलं tradition असेल किंवा म्हणजे वांग्याची भाजी या पद्धतीनं अशी घरात होते तर तुला अशीच शिकायला पाहिजे तुझा X-ray तू त्याच्यात काही टाकू शकणार नाही म्हणजे घरी आहे बाइंडिंग घरी तेच परत companyमध्ये येऊन तुम्हाला होणार होतं हे तुम्हाला आधीच लक्षात आलेलं होतं का आणि हे कसं handle केलं ?
काटदरे-पण तेच म्हणजे double by think double double हे कसं continue नाही. actually मला घरातल्या pressureबद्दलचा अंदाज असतोच लग्न होताना. पण कारखान्यातल्या pressureबद्दल मला खरंच अंदाज नव्हता. म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं असेल असं होतं. पण actually जेव्हा आले त्यावेळेला असं लक्षात आलं की माझ्याकडे माझ्या सासूबाईंच्या नजरेतनं बघितलं जातंय. म्हणजे जशी सासू काम करतेय तशी सून काम करणार. या नजरेनं बघितलं आणि त्याचं मला प्रचंड tension आलंय. कारण मी खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या सासूबाई खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे.
मग त्यांच्यासारखी मी कशी होऊ शकेल हाच मला main problem होता. आणि आता याच्यातनं कसं बाहेर यायचं हा खूप मोठा माझ्यासमोर challenge होतं. मग मी असं ठरवलं की नाही मला हा challenge आता पार करायलाच पाहिजे. कारण काही option नाही आहे दुसरा माझ्याकडे. मग मी असं ठरवलं आमचे सगळे दोर cut केलेले आहेत. कारण सगळ्यांचीच अपेक्षा होती की मी धंदा पुढं न्यायचाच आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बरोबरीनं मला हे करायचंच आहे, हे तर सगळ्यांचंच म्हणणं होतं आणि माझंही तेच होतं की मला धंदा करायचा असेल म्हणजे मला फक्त घरात नाही बसून राहायचं. म्हणजे संसार तर करायचाच आहे पण त्याच्याबरोबरीनं हे ही माझं career असलं पाहिजे. ही माझी पण पहिल्यापासनंची इच्छा होती.त्याच्यामुळेला हे इथं धडपडून स्वतःला सिद्ध करणं हे गरजेचंच आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मलाच धडपडावं लागणार आहे. कोणी माझ्या मदतीला नाही आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा मग मी काय मार्ग शोधता येतील? असे मी शोधायला सुरूवात केली. आणि सगळ्यात मला एक पहिला मार्ग जो जेव्हा मी कारखान्यामध्ये सुरूवात केली बघायला त्यावेळेला इथं ladies कामगार खूप जास्त होते. आणि त्यांनी बरेच म्हणजेच पाच ते दहा वर्ष इतकी range असणाऱ्या कामाची range असणाऱ्या बायका इथं काम करत होत्या आणि अ स्वाभाविक होतं ना की माझ्यापेक्षा त्यांनाच अनुभव खूप जास्त होता. मग मी त्यांचाच अनुभवाचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. आणि मी त्यांना हे काम सोपवायला सुरूवात केली की जेव्हा त्या माझ्याकडे यायच्या आणि मला म्हणायच्या की वहिनी हा मसाला बरोबर झालाय का बघा.
त्यांना म्हणायचे की तुला काय वाटतंय की तुझं काय म्हणणं आहे? झालाय की नाही? आपल्याला जी quality पाहिजे त्या qualityचं आहे का नाही? मग ती म्हणायची की हो वहिनी आपल्याला जसा असतो ना तसाच हा झालेला आहे. मग मी तिला म्हणायचं की okay मग काही हरकत नाहीये. मग आपण हा असाच विक्रीला नेऊया असं मी त्यांना म्हणायचे. आणि खरंतर हे माझं अज्ञान लपवायची माझी मी शोधलेली trick होती.
पण तिचा मला फायदा खूप जास्त झाला तो असा मी ज्या बाईला हे सांगायचे त्या बाईमध्ये confidence खूप वाढा तिला असं वाटायला लागलं की अरे माझं मत विचारात घेतलं जातंय. मला काय वाटतंय हे वहिनींच्या मला इथं वहिनी म्हणतात. तर वहिनींच्या दृष्टीनं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ती फुलली. हे बायकांच्या दृष्टीने पण खरंच खूप महत्वाचं असतं. घरात तुला काय कळतंय? तिला असून सुद्धा आधीपासनं सुरूवात होते.
म्हणजे काही बायकांनी ज्या आता retirementच्या boardला आलेल्या आहेत. त्यांनी तर हे बोलून दाखवलं की आपल्याला मत असतं. म्हणजे बाईला मत असतं हे आम्हाला पहिल्यांदाच किंवा मी बघायला लागल्यानंतर त्यांना हे जास्त समजलं की आपल्याला पण मत आहे. आणि हे मी त्यांचं मत विचारण्याचं आहे असं झालं की त्यांचा confidence खूप उभारला. आणि त्यांनी मग मला शिकवायला सुरूवात केली. की कसा मसाला बनवायचा आहे? त्यातल्या बारीक सारीक खचखळके काय आहेत? कसं भाजायचं आहे? आणि कसं दळायचं आहे? ती दळाई किती पाहिजे? आपल्याला quality कशी पाहिजे? तो रंग कसा येईल? तो स्वाद कसा येईल? हे त्यांनी मला शिकवायला सुरूवात केली.आणि मी काय तर त्यांचे कष्ट कसे कमी होतील याच्यात माझं डोकं लावायचा मी प्रयत्न केला मी माझं डोकं त्या recipeमध्ये नाही घेतलं formula आमचे ready होते त्याच्यामध्ये तिथं काही वाव नव्हता म्हणजे formulaच बनवायचा हा काही विषय नव्हता कारण माझ्या सासूबाईंची ती एक्सपेर्टी होती किंवा अजूनही आहे ते अजूनही फॉर्मुला वेगवेगळे बनवत असतात. त्याच्यामुळे formula fix होते आणि करायचं कसं हे ज्ञान माझ्या बायकांकडे माझ्यापेक्षा जास्त होतं.So मी त्यांचं ज्ञान वापरलं आणि माझं ज्ञान याच्यात कळलं की तुमची pro अजून simplify कशी होईल? कसं सोप्या पद्धतीनं तुम्ही अजून काम कराल आणि हे त्यांच्यासाठी जास्त चांगलं झालं कारण दिवसाच्या सुरुवातीला त्याच्या energy असायची त्यांच्याकडे आल्या आल्या आणि शेवटपर्यंत त्या खूप थकून जायच्या इतकं त्या कष्ट करायच्या आणि मी जसं माझे techniques काही त्याच्यामध्ये वापरायला लागले माझं डोकं त्याच्यामध्ये लावायला लागले तशे त्यांचे कष्ट कमी झाले आणि त्यांना दिवसाच्या शेवटला सुद्धा खूप fresh वाटायला लागलं की आपण खूप थकलोय अरे बाप रे अजून हे करायचंय असं नाही मी काही करते.हा उत्साह त्यांच्यामध्ये यायला लागला. आणि मग त्यांना जसं मी म्हटलं की त्यांचा confidence वाढला. तसंच त्यांना अजून हे वाटायला लागलं की या वहिनी आल्या आहेत त्या आपलं काम सोपं करण्यासाठी आल्या. आपल्यावर मालकी हक्क गाजवायला नाही आले. मग त्यांच्या बरोबरीनं बसणं, उठणं, त्यांच्या घरी जाणं सुरु झालं.
प्रियदर्शिनी हिंगे -जेव्हा तुम्ही वारसा किंवा तर त्या handle करणं जास्त अवघड आहे का? जसं या पद्धतीनं तुमचं सुरू केलंय business आणि आता तुम्हाला स्वतःच input त्याच्यात द्यायचं आहे म्हणजे स्वतःच सुरू करणं हे जवळचं जास्त सोपं असतं असं आपण म्हणूया आणि जे already established आहेत तिथे स्वतःला कुठेतरी tweet करायचं आहे.किंवा हे tweet type करून वाढवायचं आहे
काटदरे -मी म्हणेन की दोन्ही गोष्टी हो म्हणेन. कारण जेव्हा स्वतः निर्माण करायचं आहे. तेव्हा सगळी framework आपल्या समोर clear पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते पण खूप अवघड आहे की ती framework तयार करणं. आणि मी जशी आले की माझ्यासमोर एक framework होती. त्याच्यामध्ये स्वतःला घालायचे. आणि असं काहीतरी वेगळं करायचं आहे की माझं अस्तित्व निर्माण होईल. किंवा माझं character एक तयार होईल.
माझी image एक तयार होईल. मला जे करायचं आहे ते त्याच्यामध्ये तयार होईल. हे करणं हेही खूप अवघड आहे. कारण पहिलं जे काही आहे म्हणजे माझे सासू सासरे जसे वागत होते लोकांशी किंवा त्यांची कारभार करायची जी पद्धत होती. त्या पद्धतीनं बाहेर येऊन माझी स्वतःची एक पद्धत तयार होणं हे सुद्धा खूप अवघड आहे करायला असं मला वाटतं. आणि ते माझ्यासाठी सोपं झालं माझ्या लोकांमुळे मी माझ्या लोकांबरोबर माझे सूर जुळवले. मी मालक आहे हे बाजूला ठेवलं आणि मी तुमच्यातलीच एक आहे. हे मी त्यांना सतत भासवायचा, त्यांना दाखवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्या वेळेला ती लोकं माझ्याशी attach झाली. मला ती team building करणं जे आहे ना किंवा हे सगळं आपलं आहे. आपण मिळून हे मोठं करूया. हे जेव्हा त्यांना मी confidence देऊ शकले ना. तेव्हा मग ती frame अजून आणि स्वतःच एक अस्तित्व निर्माण करणं माझ्यासाठी खूप सोपं होईल.
प्रियदर्शिनी हिंगे - तुम्ही value addition आपण जेव्हा म्हणू शकू ते तुम्ही केलं. पण establish करणं आणि आता पुढे पुन्हा वाढवायचं आहे. तर हे वाढवताना हे प्रयत्न करताना या बरोबरीनं घर, कारखाना यातलं employees म्हणजे हेही एक वेगळं घर किंवा वेगळं कुटुंब होतं. ही अशी तिहेरी कसरत याच्यामध्ये काही trick वापरलेत का?
काटदरे- Tricks म्हणाल तर अशा काही खूप वेगळ्या नाही वापरल्या मी फक्त एकच केलं की मी नेहमी मी माझ्याशी प्रामाणिक राहिले. मी हे का करते आहे? हे मी माझ्या आधी पक्क डोक्यात केलं की मला हे करायचं आहे.आणि मग मी ते करायला गेले. कोणाची copy करायला नाही गेले. मला जर वाटलंय की मी आत्ता खूप चिडचिड केली आहे. एखादा effly असतो की काहीतरी डोकं फिरवतो, आपली खूप चिडचिड होते. आणि आपण टाळताळ त्याला बोलतो, की ठीक आहे. पण मी जेव्हा शांत झाले तेव्हा मला असं वाटलं की नाही माझं चुकलं. म्हणजे चूक एवढीशी होती एवढं काही मोठं त्याचं वादळ निर्माण करायची काही गरज मग मी अगदी सहजपणे जाऊन त्या माणसाला अगदी माझ्या employeeला sorry म्हटले की sorry माझं चुकलं म्हणजे एवढा दंगा खायची काही गरज नव्हती.पण ही चूक झाली आहे आता या चुकीतनं आपण काय सुधारणा करूया. हे मी त्याच्याशी बोलले आणि मी मी म्हटलं तसं की मीही माझ्याशी प्रामाणिक राहते. मी असं नाही म्हटलं की मी नाही sorry म्हणणार, मी मालक आहे. असं मी कुठं नाही केलं. आणि मी माझ्यातला मालक बाजूला ठेवल्यामुळं ही गोष्ट माझ्यासाठी खूप सोपी झाली. आणि हीच trick मी माझ्या घरीपण वापरली. मी मुलांशी खूप संवाद साधते.आज तुमच्या दिवसभरात काय काय घडलं? मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटलं? किंवा आम्ही जेव्हा एखादा प्रवासाला जातो किंवा कुठं जातो? तिथं एखादी घटना समोर घडली असेल किंवा कोणाचं वागणं असेल? की जे मला असं वाटलं की नाही हे आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे हा की हे बरोबर नाही आहे वागणं हे तुम्हाला आवडलं का बघा किंवा हे किती बघा योग्य वागतायेत? हे मी मुलांशी dialogue करणार आणि त्याच्यामुळे की मुलांनी accept केलं की आपली आई काम करतीये आणि शिवाय माझा त्यांच्याशी मैत्रीचं नातं या गोष्टीमुळे निर्माण झालं. आणि मग त्यांच्या मनात तो एक जो आदर असतो ना आईबद्दल किंवा आई आपल्याला खूप कमी वेळ देते. तरीसुद्धा मला आई हवी आहे. हे त्याच्यामुळं कुठंतरी ते मुलांच्यामध्ये link झालं. म्हणजे ही जी स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि सतत दुसऱ्याबरोबर dialogue साधनं हे मी जसं कारखान्यात ठेवलं, तसंच घरीही ठेवलं.याचा मला फायदा खूप झाला कारण ही कारखान्यातली सगळी लोकं माझी अशी खूप attach झाली.
प्रियदर्शिनी हिंगे -लग्नाच्या आधी कधी तुम्ही स्वतः काटदरे मसाले याचं नाव ऐकलं होतं का? आणि कधी imagine केलं होतं का? की आपण अशा पद्धतीनं काही business करू. मसाल्यांमध्ये जाऊ असा काही डोक्यामध्ये विचार केला होता.
काटदरे -अजिबात नाही. लग्नाच्या आधी तर मी काटदरे मसाले हे नावच ऐकलं नव्हतं. कारण कोकणात तो येतंच नव्हता. पण मला हे imagineही नव्हतं की मला इथं आल्यानंतर काय काय करावं लागेल. actually मसाल्यांचा प्रवास एकोणीसशे अठ्ठावन्न पासून सुरु झाला म्हणजे आमच्या आजी आजोबांनी म्हणजे आजी सासऱ्यांनी हा सुरु केला.त्यावेळेला त्यांची परिस्थिती अशी होती की पोटच्या पाच पोरांना खायला काय घालायचं? या एका संकल्पनेतनं सुरु केलेला हा त्यांनी व्यवसाय होता. कारण आमच्या आजींच्या हाताला खूप चव चांगली होती. आणि त्याचा फायदा करून घ्यावा म्हणून आजोबांनी सुरु केला. मग माझ्या सासू सासऱ्यांनी तो वाढवला तर त्यांचा त्यांची stage होती की पहिली stage होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तो चालवायला सुरूवात केली त्यावेळेला हे नाव पुढं न्यायचं आहे कारण सातारा आणि मसाले हे नाव खूप attach होतं म्हणजे लोकांना ते खूप वाटतं की सातार्यात गेल्यानंतर कागदाने मसाले घ्यायचेच असं त्याच्यामुळे तो brand आम्हाला मोठा करायचा आहे हे आव्हान आमच्या दोघांसमोर होतं.त्यामुळे हे मोठं आवाहन पेलताना मला पूर्णपणे कारखान्यातली HR activities बघाव्या लागतील. असं मला खरंच वाटलं नव्हतं. आज माझ्या हाताखाली ऐंशी लोकं काम करतात. या ऐंशी लोकांचं parenting करणं हे खूप अवघड काम आहे आणि ते मला करावं लागतं. जव ळपास एक पंधरा, सोळा जिल्ह्यांमध्ये आमचा माल जातो. अडीचशेहुन जास्त आमचे distributors आहेत. शिवाय एक एक्स्पोर्ट ही होतो Englandला होतो अमेरिकेत होतो, Australiaला होतो, Singaporeला होतो. अशा बऱ्याच देशांमध्ये होतो.
covidच्या काळात आम्ही onlineसुद्धा विक्री केली. खूप लोकं असे होते की जे आम्हाला मागणी करत होते की आम्हाला covidमुळे आता काही शक्य नाहीये साताऱ्याला येणं आणि तुमचे मसाले आम्हाला मिळत नाहीत. जे मला आमच्या रोजच्या जेवणातली चव आम्हाला खरी आहे. या सगळ्या आघाडींवर काम करताना HR activitiesमध्ये खूप महत्वाचं काम करावं लागतं की ते मी करते.मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला एवढं सगळं करावं लागेल.
प्रियदर्शिनी हिंगे -मसाले foreignमध्ये जातात आपण इथे बसूनही इकडनं लोकांचा प्रतिसाद येतोय.तेंव्हा काय वाटत ?.
काटदरे -छान वाटलं पण मुळात मसाले विकणं किंवा कुठली गोष्ट विकणं ही एक वेगळी बाब आहे हो आणि लोकांचा वेगळा प्रतिसाद मिळणं कारण जेव्हा तुम्ही foreignमध्ये असतो तेव्हा naturally आपलं originalचं असणं हे किती काय प्रकारचं असू शकतं हे समजू शकतं बरोबर आहे. तर ह्या ज्या प्रतिक्रिया येतात ना त्याला खरंच खूप छान वाटतं पण खरं सांगायचं तर दडपण जास्त येतं कारण मी production पाळते so ती quality आणि ती चव maintain करणं ही जबाबदारी माझ्यावर लागते त्याच्यामुळेला ज्यावेळेला अशा पद्धती येतात त्यावेळेला खूप छान वाटतं की ही आपल्या कामाची पोचपावती मिळाली असं मला वाटतं आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा तेव्हा मी कारखान्यातल्या माझ्या सगळ्या लोकांपर्यंत ह्या प्रतिक्रिया पोहोचवते कारण मी त्यांना म्हणते की हे नाव आहे पण हे सगळं करण्यापाठीमागचे हात तुमचे आहेत. आम्ही दाखवण्याचा चेहरा आहोत पण प्रत्यक्ष काम तुमचं आहे. त्याच्यामुळे ही पावती तुमच्यासाठी आहे. की आम्हाला तीच चव, तीच quality नेहमी मिळते. आणि आम्हाला तेच हवं आहे. त्याच्या वेळेला जेव्हा आम्ही exportला गेलो किंवा जेव्हा आम्हाला बाहेरनं या लोकांच्या प्रतिक्रिया येतात की आम्हाला इथं कारखान्यांचा मसाला मिळाला आणि आम्हाला इतका आनंद झाला असं ते videos पण पाठवतात आम्हाला त्यामुळे ही पोचपावती खरंच खूप आपण जी काही मेहनत करतो त्याचं फळ आहे हे जाणवतं.
प्रियदर्शिनी हिंगे -- महिला ज्या काहीतरी करू बघतायेत मग काहीतरी production तयार करतात किंवा कुठल्यातरी उद्योगामध्ये उतरायचा प्रयत्न करतात हो अशा या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल?
काटदरे-मी सांगेन म्हणजे मी आत्तापर्यंत खूप महिलांना भेटले त्यांच्यापैकी बऱ्याचशा महिला मला अशा भेटल्या की वयाच्या चाळीशीनंतर नवर्याच्या businessमध्ये entry करणार आहे आम्हाला भेटल्या.आणि त्यांना हे फार आश्चर्य वाटलं की तू कसं काय production वगैरे बघू शकते कारण त्यांना वाटतं की हे खूप सोपं आहे actually सोपं नाही आहे. पण मी अशा महिलांना म्हणेन की तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मला याच्यात मला यायचं तर आहे businessमध्ये पण मला याच्यातलं समजत नाही. तर असं नका म्हणू आपल्याला खूप समजतं. सगळ्यात महत्वाचं ना team बांधणं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही धंद्यासाठी कारण आपण एकटे काहीच नाही करू शकत.जेव्हा अख्खी team बरोबर असते तेव्हाच तुमचा धंदा वर जाऊ शकतो. आणि ही teamमधनं parenting खूप महत्वाचं असतं. आपण इतके वर्ष आई म्हणून जे आपल्या मुलांसाठी केलेलं आहे ना किंवा मोठी मुलं झाल्यावरही करावं लागतं. तेच आपल्याला इथंही करावं लागतं, कारखान्यातही करावं लागतं.
ही जी आपली खूप चांगली गोष्ट आहे स्त्रियांकडची parentingचे पालकत्व सांभाळण्याची ती तुम्ही कारखान्यात येऊन करा आणि तुम्ही team बांधण्याकडे जास्त लक्ष द्या की ती team कशी motivate राहील त्यांच्यासाठी काय काय वेगवेगळ्या activities करता येतील जे त्यांना त्यांच्या personal आयुष्यामध्ये करणं शक्य नाहीये ते त्यांना इथं धडपडून कसं दाखवून देता येईल. स्वतःच कर्तृत्व याच्यासाठी तुम्ही काम केलंत ना तर तुम्ही ते खूप interesting आहे आणि ते नक्की जम मला असं वाटतं की खरंतर याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग सांगितलाय.
प्रियदर्शिनी हिंगे --बऱ्याचदा असं होतं की midlifeमध्ये महिलांना लक्षात येतं की आता आपल्याकडे काही नाहीये करायला आणि आता मी काय करू? तर आत्ता जो दीपा madamनी आपल्याला सल्ला दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा की आपल्याकडे काही नाही असं होत नाही खरंतर तुमच्याकडे काही ना काही skill असतं. ज्याच्यातलं parenting जे skill आपण कधीही वा सोडतच नाही खरंतर तर हे skill आपण वापरूनही आपला उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं उभारू याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या माध्यमातनं ते दाखवून दिलंय.पण हे जरी असलं तरी स्वतःला याच्याबद्दलची clarity असणं जी दीपा madamला होती. आणि त्यामुळे आजपर्यंत त्या फक्त successful नाहीतर सातासमुद्रा पारही नेऊ शकल्या. त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल clarity आहे का? आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि आपल्याकडे काय आहे? तर हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला आकाश हे थोडं कमी पडेल, आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी तर आज दीपा madamनी आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच महत्वाच्या असतील पण या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला झालाय की नाही झालाय हे आम्हाला तुम्ही सांगायला विसरू नका आणि madam thank you so much म्हणजे तुमची journey ही कदाचित आणखीन कुठल्याही महिलेची journey नक्की होऊ शकेल असं म्हणू