कॉलेज, लग्न, मुलांची जबाबदारी पार पडल्यानंतर तिने तिचे स्वप्न पूर्ण केले...
X
मुलींनी शिक्षण घेतलं म्हणजे त्यांना चांगला शिकलेला मुलगा मिळेल अशीच काही धारणा समाजाची आजही आहे. शिक्षण घेऊन लग्न झालं की घरीच बसायचे हे पाहून प्रियंवदा पवार अस्वस्थ झाल्या. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनामध्ये होते. लहानपणापासूनच कलेची आवड होती. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की, इतकं सगळं करायचं आणि लग्न करून घरीच बसायचं का? लग्नच करायचं असेल तर हीच शैक्षणिक वर्ष आपण जगलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांची आवड असलेला फाइन आर्ट कोर्स करण्याचे ठरवले आणि त्यांना हा कोर्स करण्याची संधी मिळाली सुद्धा. प्रियंवदा पवार यांच्या आई यादेखील उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी देखील फाईन आर्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण त्यांचं ते स्वप्न अनेक कारणांमुळे अपूर्ण राहिले. आता आईचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्रियंवदा यांना मिळाली होती. घरचे अत्यंत सपोर्टिव्ह असल्यामुळे संघर्ष त्यांच्या वाट्याला फार कमी आला. त्यांनी फाईन आर्ट कोर्स पूर्ण केला. एका अर्थाने एक टप्पा पार झाला होता. पण कॉलेज संपताच लग्नाच्या चर्चा घरी सुरू झाल्या. या बाबतीत देखील त्यांना सर्व त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार निवडता आला. त्यांनीच त्यांचा जोडीदार निवडला आणि लग्न सुद्धा झालं. पण लग्नानंतर ज्या जबाबदाऱ्या येतात त्या त्यांच्यावरती देखील आल्या. आणि हे सगळं करत असताना मग स्वतःसाठी काहीतरी करायचं यासाठी विचार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही.
घरच्या जबाबदारीच्या ओझ्यात कुठे ना कुठे महिला स्वतःचं अस्तित्वच खालावत असतात. कारण महिला त्याच कामात समाधान मानू लागतात.प्रियंवदा यांच्या सोबत देखील हेच झालं पण ज्यावेळी मुलं थोडी मोठी झाली त्यावेळी विचार करण्याची संधी मिळाली. पुन्हा नव्याने सुरवात करण्याचं त्यांनी ठरवलं. दहा-पंधरा वर्ष घरी राहिल्यानंतर आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास संपून गेला होता. पण मनात ठरलं होतं आपल्याला स्वतःची आर्ट गॅलरी सुरू करायची आहे. कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न त्यांनी आयुष्याच्या मधल्या टप्प्यावरती असताना पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली आणि त्या त्यात यशस्वी झाल्या. त्यांचं हेच यश आज ज्या अनेक महिला कलागुण असूनही गृहिणी म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे. कॉलेज, लग्न, मुलांची जबाबदारी आणि त्यानंतर पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रियंवदा पवार यांची धडपड, प्रयत्न सर्वांनी पाहण्यासारखे आहेत व अत्यंत प्रेरणादायी आहेत...