Home > Max Woman Talk > आदिती तटकरे त्यांच्याकडच्या चार खात्यांची नावे विसरतात तेव्हा

आदिती तटकरे त्यांच्याकडच्या चार खात्यांची नावे विसरतात तेव्हा

आदिती तटकरे त्यांच्याकडच्या चार खात्यांची नावे विसरतात तेव्हा
X

माजी राज्यमंत्री अदिती तटकरे यांचा राजकीय वारसा आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण असं असलं तरी राजकारणात येत असताना त्यांच्यापुढे अनेक आव्हाने होती. पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानभवनात गेलेल्या आदिती तटकरे यांना पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्री म्हणून देखील स्थान मिळालं.. राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती बारा खात्यांची जबाबदारी होती.. आता या बारा खात्यांमधील चार खाती कोणती होती यांची नावं आज देखील आदिती तटकरे यांना माहित नाहीत. हा अत्यंत मजेशीर असा एक किस्सा आहे, नक्की त्यांच्यासोबत काय घडलं होतं आणि त्यांना त्यांच्याच खात्यांची नावे माहीत कशी नव्हती? हा संपूर्ण प्रसंग त्यांनी MaxWoman Conclave मध्ये बोलताना सांगितला आहे. काय आहे तो किस्सा पाहुयात..

अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांना जरी मोठा राजकीय वारसा असला तरी सुरुवातीला त्या राजकारणात येणार की नाही हे त्यांना देखील ठाऊक नव्हतं.. म्हणूनच त्यांनी महाविद्यालयीन काळात शिकत असताना राज्यशास्त्र आणि इतिहास असे विषय निवडले होते आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात फेलो प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण त्यांचा हा प्रवास काही काळापुरताच मर्यादित राहिला कारण त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची वेळ आली.. 2009 मध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare)यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यात पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची जबाबदारी वडिलांनी त्याच्यावर दिली आणि त्यांची राजकारणातील एन्ट्री झाली. जिल्हा परिषद निवडणूक, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा प्रवासानंतर 2019 च्या निवडणूकीत त्यांना विधानसभेची संधी आणि त्यानंतर मंत्रीमंडळात काम करण्याचीही संधी दिली. त्यानंतर वेगवेगळ्या आठ खात्यांचा पदभार अदिती तटकरे सांभाळत होत्या. पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलेल्या अदिती तटकरे यांनी ही सर्व खाती अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. त्यानंतर त्यांच्या खांद्यावरती आणखीन चार खात्यांची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्या चार खात्यांची नावे देखील आदिती तटकरे यांना आठवतं नाहीत.. आता एखाद्या खात्याचे मंत्रीपद तुम्हाला मिळतं आणि त्याचं नाव तुम्हाला माहित होत नाही किंवा आठवतं नाही असं कसं होऊ शकतं?

आदिती तटकरे ज्या आठ खात्यांचा पदभार सांभाळत होत्या त्या व्यतिरिक्त त्यांना आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला, म्हणजेच एकूण बारा खाती राज्यमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्याकडे होती. पहिला आठ खात्यांचा पदभार सांभाळत असताना त्यांच्यावर 2022 च्या जून मध्ये फक्त चारच दिवसांसाठी आणखीन चार खात्यांचा पदभार देण्यात आला होता. अडीच ते पावणेतीन वर्ष आठ खात्यांचा पदभार सांभाळणाऱ्या आदिती तटकरे यांना चार दिवसांसाठी आणखीन चार खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती, आणि हाच अत्यंत मजेशीर किस्सा त्यांनी MaxWoman Conclave मध्ये सांगितलं आहे. यासोबत अदिती तटकरे यांनी त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास कसा सुरू झाला या सगळ्यासोबत अनेक गोष्टीबाबत आपलं मत व्यक्त केला आहे. हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की MaxWoman ला भेट द्या.., बाकी आदिती तटकरे यांच्यासोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

Updated : 16 May 2023 8:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top