Home > Know Your Rights > खास महिलांसाठी काय आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना?

खास महिलांसाठी काय आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना?

खास महिलांसाठी काय आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना?
X

राज्य सरकार व केंद्र सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतं पण कधी कधी या योजना महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. किंवा तशी योजनांची माहिती पोहोचवण्याची काम फारसं होत नाही. त्यामुळे बऱ्याच योजना लोकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. पण काळजी करू नका मॅक्स वूमन महिलांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी follow आणि subscribe करा मॅक्स वूमनला.

सर्वात प्रथम तर महिलांसाठी आरोग्याच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याची माहिती घेऊया.





प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

या योजनेचा लाभ गरोदर महिला घेऊ शकतात.

योजनेच्या लाभाच्या अटी व लाभ

१) पहिल्या अपत्यासाठी दोन हप्त्यात पाच हजार रुपये चा लाभ आणि दुसऱ्या वेळी मुलगी जन्मल्यास एका टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.

2) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रुपये आठ लाख पेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

3) लाभार्थीचा गर्भपात अथवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थीला भविष्यातील गर्भधारणेमध्ये नवीन लाभार्थी म्हणून मानले जाऊन पूर्ण लाभ दिला जातो.

योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे

१) अर्जदाराचा फोटो,आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक)

2) रेशन कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स

3) एम सी पी कार्ड (माता- बाल संरक्षण कार्ड) व मोबाईल क्रमांक

तर या योजनेचा अर्ज कुठे करावा?

तर महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करायचा आहे.


Updated : 23 Jan 2024 10:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top