Home > Know Your Rights > समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?

समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?

ज्यामुळे लोक आत्महत्येसारखा टोकाचा विचार देखील करतात.

समजून घ्या सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?
X

प्रसिध्द महिला पत्रकार राणा अयुब यांना 'सायबर बुलींगचा' सामना करावा लागतोय. कोरोनामुळे सर्वच बंद झाल्यामुळे सध्या अनेक गोष्टी 'ऑनलाइन' झाल्या आहेत. मग त्या शाळा असोत की तुमच्या ऑफीसचं काम सर्व ऑनलाइन. या ऑनलाइनच्या जगात सायबर गुन्ह्यांच प्रमाण देखील तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. सध्या या सायबर क्राइमचा एक नवा प्रकार समोर येतोय तो म्हणजे 'सायबर बुलींग'.

झालय काय तर, प्रसिध्द महिला पत्रकार राणा अयुब यांना सोशल मीडियावर सतत अश्लील भाषेत मेसेजेस पाठवले जात आहेत. जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर करुन राणा अयुब यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलीस या लोकांवर कारवाई करतील का? असा प्रश्न विचारला आहे.

या मेसेज मधील भाषा एवढी विखारी असते की, यातून काही लोक आत्महत्येचा देखील विचार करतात.

सायबर बुलींग म्हणजे नेमकं काय?

सायबर क्राइमच्या या प्रकाराला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपण त्याला 'ऑनलाइन गुंडगिरी' म्हणू शकतो. इंटरनेटवर एखाद्याला अभद्र भाषेत, फोटो आणि धमक्या देऊन त्रास देणे सायबर बुलींगच्या प्रकारत येतं. त्याच बरोबर एखाद्याला ट्रोल करणे, एखाद्याची ओळख वापरणे, एखाद्याचा खाजगी फोटो किंवा वस्तू सार्वजनिक करणे किंवा अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाठविणे यासारखे बरेच प्रकार असू शकतात.

सायबर तज्ज्ञ काय म्हणतात?

'सायबर बुलींग' असा कुठला डायरेक्ट शब्द आपल्या कायद्यात नाही. पण, 'सायबर स्टॉकींग' हा शब्द वापरलेला आहे. जेव्हा निर्भया प्रकरणावेळी फौजदारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली त्यावेळी यात 'भारतीय दंड संहिता कलम 354 ड' टाकण्यात आलं. "या कायद्यातंर्गत आरोपीला अटक व तिन वर्ष कारावासाची शिक्षा होवू शकते. तशी तरतुद या कायद्यात आहे." अशी प्रतिक्रीया अॅड. डॉक्टर प्रशात माळी यांनी दिली आहे.

राणा अयूब प्रकरणात पुढं काय झालं?

याची गंभीर दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी घेतली. विकृत मानसिकता बाळगून सायबर बुलिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली. त्यानंतर काही तासातच नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Updated : 27 Jun 2021 12:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top