Home > हेल्थ > भाजलेला किंवा कोणताही त्वचेवरचा डाग सहजगत्या जाऊ शकतो?

भाजलेला किंवा कोणताही त्वचेवरचा डाग सहजगत्या जाऊ शकतो?

भाजलेला किंवा कोणताही त्वचेवरचा डाग सहजगत्या जाऊ शकतो?
X

लहानपणी खेळताना किंवा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना अनेकदा हातपाय भाजतात व त्याचे काळे मोठे डाग जन्मभराची एक खून म्हणून राहतात. शरीरावर असं काही भाजलं किंवा मोठी जखम झाली तर या जखमा काही आठवडे किंवा एक-दोन महिन्यांत बऱ्या होतात. पण त्या जागी डाग आयुष्यभर राहतो. व हा डाग नेहमी त्या गोष्टीची आठवण करून देत राहतो. मह्त्वाचे म्हणजे त्वचेच्या सौंदर्याची हे डाग संपूर्ण वाट लावून टाकतात.. आता प्रत्येकाच्या नाजरा आपल्या शरीरावर असलेल्या अशा डागांकडे गेल्या असतील, बरोबर ना.. पण हा तुमचा डाग जाऊ शकतो.. पण कसं ते पाहण्यासाठी तुम्हाला इथून पुढे २ मिनिट वेळ द्यावा लागेल.. व्हिडिओच्या शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल इतकं मात्र नक्की...

शरीरावर असलेल्या अशा डागापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक सर्व प्रकारचे उपाय करतात. औषधे, क्रीम याशिवाय अनेक प्रकारचे घरगुती उपचारही सुचवले जातात. यातील अनेक प्रिस्क्रिप्शन देखील मिथकांवर आधारित आहेत. ज्याचा काही उपयोग नाही. तर अशा स्थितीत डाग खोलवर पडू नये म्हणून जळल्यानंतर काय करावे आणि डाग पडल्यानंतर तो कसा काढायचा हे डॉक्टरांकडून जाणून घेणे आवश्यक आहे.

उपचार हा डागाच्या वयावर आणि खोलीवर अवलंबून असतो...

जळलेल्या जखमांवर उपचार हे त्याचे वय आणि खोली यावर अवलंबून असते. जर डाग फार जुना आणि खोल नसेल तर तो घरगुती उपायांनी किंवा औषधांनी बरा होऊ शकतो. पण डाग जुना आणि खोल असेल तर तो सहजासहजी जात नाही. अशा डागांवर औषधे आणि क्रीम्सही कुचकामी ठरतात. अशावेळी लेझर थेरपीने तो बरा होऊ शकतो. आजकाल ही थेरपी अगदी लहान शहरांमध्येही सहज उपलब्ध आहे. त्यामुळे अशा डागांमुळे तुम्ही वैतागला आहेत तर तुमच्या जवळ असलेल्या त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.. बाकी कोणी काही सांगतात म्हणून उपचार करू नका यात तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही जातील धन्यवाद...

Updated : 9 May 2023 9:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top