Lockdown : मुली आणि मासिक पाळी
X
औरंगाबाद शहरातील स्थलांतरित कुटुंबातील तेरा-चौदा वर्षाची पायल (नाव बदलले आहे ) मुलगी पायी चालत असतांना पोटाला हात लावून चालत होती. तिच्या सोबत तिची आई, अजून दोन भावंड आणि त्यांच्या सोबत असलेली एक स्त्री होती. तिला पाहिल्यावर कदाचित भुकेने व्याकूळ झाली असावी म्हणून आमच्या सहकार्यांनी तिला बिस्किट पॅकेट देऊ केले. तिने बिस्किटचे पॅकेट घेऊन आईकडे दिले आणि तशीच पोटाला हात लावून कन्हत होती. पुन्हा आमचा तर्क चालून दमली असावी म्हणून पोट दुखत असेल. म्हणून तिला काय झाले विचारले, तेव्हा तिची आई रेखा म्हणाली, ‘नाही ! ‘उस वजहसे नही, उसका महिने का चार दिन चल रहा है ना’ ! ‘कोनू बात नही हर महिने का है’. ‘कल तक ठीक हो जावेगा’. हमको भी पहिले बहोत दर्द होता था, तब इट चुल्हे पर गरम कर पेट सेकते थे. शादी के बाद फिर शहर आये. हम भ्रमंतू है (भटका समाज). जहा जगह मिल जाये वही बस जाते है. हम जब शहेर मे थे तब आधा समय तो पानी लाने में लग जाता है, फिर मजदूरी भी करो. हमने तो गर्भवती अवस्था में भी मजदूरी की है. माहवारी के समय दर्द इतना होता है कि घर आकर पहलें अपने आपको सेकते थे, फिर खाना बनाते हैं . ” “खाना बनाते बनाते खुद को कोसते है, कैसे जिंदगी है, महावारी के टाइममे भी आराम नही मिलता.” जैसे हमरी जिंदगी कटी वैसे हमरी बेटी की भी कट जायेगी. है तो औरत ही ना. तिचे हे बोलणे ऐकून एक क्षण आम्ही स्तब्ध झालो.
पुन्हा तिला विचारलं फिर महावारी का कपडा कहा धोते हो? यावरचे उत्तर ऐकून मात्र आम्ही निरुतर झालो. ‘ती म्हणाली, दीदी कपडा काहे का? अभी तो जीने की मुश्किल सामने है. काम नही नही. सारी दुनिया बंद पडी है. इसमे फस गये है. जो कुछ था वो साथ लेकर निकले है. महावारी मे कपडा कहा से लेंगे. ‘सुखी घास’ का इस्तेमाल करते है. कपडा धोने के लिये पाणी भी तो चाहीये. गाव से काम की तलाश मे आये थे. आज सब बंद है तो काम नही है. रोज चावल खा रहे है. हात मे जो कुछ पैसे था, वो खत्म हो चुका है. कपडा कहा से लेंगे. तिच्या प्रश्नासाठी आमच्याकडे काही उत्तर नव्हते. तरीही तिचे बोलून झाल्यावर तिला घास क्यो लेती हो. इससे तो और तकलीफ हो सकती है. बीमारी भी हो सकती है. त्यावर रेखा सांगत होती, तकलीफ होती है. पर क्या करे. अभी तो जीना मुश्किल है. जो कुछ है उसीमे थोडा थोडा मिलकर खा रहे है. हम तो भुखे रहे लेवेंगे, बच्चो को कैसे भुका रखे. बाहर बंद है, नही तो कमसे कम भीखही मांगते. इसमे कपडा कैसे मिलेगा. कपडा है तो पाणी नही है, पाणी है तो कपडा नही है. और कपडा धोनेके बाद कहा सुखाये? झोपडी के बाहर सुखा नही सकते. इसलीये मुलायम घास ले लेते है. थोडा बहोत दर्द होता पर क्या करे सहेन करना पडता है. जालना रोडच्या कडेला हे सगळेजण थांबले आहेत.
लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्थलांतरित लोकांना अन्न-पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तर लॉकडाऊनमध्ये स्त्रिया-मुलीचे आरोग्याचे, सुरक्षेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वैयक्तिक आरोग्याच्या सुविधासाठी किरकोळ बाबीही मिळत नाही तिथे खर्च कोठून करायचा. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात पॅड नाही तर कपडा मिळाला पाहिजे तर तोही मिळत नाही. नुकत्याच वयात आलेल्या मुलींच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. गवताचे पाते शरीराच्या एका नाजुक अंगावर चार चार दिवस ठेवावं लागत यापेक्षा क्लेशदायक काय असू शकते. याला वाईट म्हणायचं की, तरुणांच्या देशात नवतरुण पिढीला आरोग्याच्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नही खंत व्यक्त करायची. राज्यात शालेयमुलीसाठी अस्मिता योजना राबविली गेली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड येथे पॅडसाठी मशीन लावण्यात आले. पण रस्त्यावर राहणार्या स्त्रिया-मुलीसाठी काय करायचं आणि हा प्रश्न लॉकडाऊन पुरता मर्यादित नाही. रोजगाराच्या शोधात लाखो लोक कुटुंबासहित स्थलांतरित होतात. यात लहान मुलामुलींचाही सहभाग असतो.
कोणतही संकट एकट येत नाही त्याच्यासोबत संकटाची साखळी घेऊन येते. या संकटाच्या साखळदंडाच्या बेडीत पिढ्यानपिढ्या स्त्रिया-मुली लॉकडाऊन होतात. घटना कोणतीही असो स्त्रिया आणि मुले यांचा बळी मोठ्या प्रमाणात जातो हा इतिहास आहे. सॅनिटरी पॅड जीएसटीतुन वगळावे यासाठी या देशात आंदोलन करावे लागते. अर्थातच पॅडचा खर्च परवडणारा आणि खर्च करणारा वर्ग आर्थिकदृष्ट्या सधन आहे. पण ज्या देशातील स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात घरगुती कपडा मिळत नाही आणि मिळणंही अवघड होऊन बसलय. त्याच्या आरोग्याच्या हक्काचं काय. बेटी बचाव बेटी पढाव , किशोरी सक्षमीकरण कार्यक्रम आखताना धोरण ठरवतांना अशा सगळ्या घटकांतील मुलीचा विचार कधी केला जाईल??
-रेणुका कड