टॉप १० कोरोनाबाधित देशात ‘या’ देशाने मिळवलं मृत्यूंवर नियंत्रण
X
संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 55 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पण वर्ल्डोमीटर संस्थेच्या आकडेवारीनुसार यातील 22 लाख 99 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 लाख 46 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 28 लाख 48 हजार 682 आहे.
हे ही वाचा...
- ‘जातीधर्माची भांडणं आम्हाला नकोयत’, रुपाली पाटील यांचा मोदींवर निशाणा
- भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
- १५ जूनपासून राज्यात शाळा सुरु? वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत
एकूण एक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त 2 टक्के म्हणजे 53 हजार 224 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित 98 टक्के रुग्णांना सौम्य त्रास होत आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे सुमारे 99 हजार नवीन रुग्ण आढळलेले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 84 हजार 445 झाली असून मृत्यूंची संख्या 99 हजार 300 झाली आहे.
ब्राझील मधील रुग्णांची संख्या 3 लाख ६५ हजार २१३ आहे. तर मृतांचा आकडा 22७४६ इतका झालाय. तिसऱ्या स्थानी ३ लाख ४४ हजार ४८१ रुग्णसंख्येसह रशिया आहे. रशियाला मृतांची संख्या रोखण्यात पहिल्या दहा देशांच्या तुलनेत सर्वाधिक यश मिळालय. ३५४१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भारत या यादीत १० व्या स्थानी असून 138,845 एकुण रुग्ण देशात आहेत. तर, ४०२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.