कोरोना लसिचा सेक्सवर परिणाम होतो का? तज्ज्ञ म्हणतात..
कोविड शी मुक़ाबला करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या लसींमुळे सेक्स करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो का? सध्या हा प्रश्न इंटरनेट वर व्हायरल आहे. लस घेतल्यानंतर काही लोकांना साइड इफ़ेक्ट जाणवले, मात्र हे साइड इफ़ेक्ट सेक्स वर ही जाणवतात का अशी शंका अनेकांना भेडसावते आहें, विशेष म्हणजे याची उत्तरे अनेकजण इंटरनेट वर शोधत आहेत. अर्थातच हा शोध घेणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे.
X
चीन मधून २०१९ ला सुरू झालेल्या कोरोना माहामारीवर अखेर वर्षभरानंतर जानेवारी २०२१ मध्ये लस आली. या दरम्यान लोकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. अनेकांना कोविडची लागण झाली. त्यामुळे शरिराच्या आतील कमजोरीचं प्रमाण वाढल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.
त्यात कोरोना बरा करणारी सिरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवेक्सीन या लसी घेतल्यानंतर त्याचा सेक्स लाईफवर परिणाम होतो का? असा प्रश्न विचारण्यात येतोय. कोरोनावर लस बनवणारी एक कंपनी सेक्स पावर वाढवणारं वायग्रा ही बनवते. वायग्रामुळे कामभावने दरम्यान अधिक उत्तेजना निर्माण होते. या कंपन्यांनी लस बनवण्यात पुढाकार घेतल्याने त्याचा संबंध सेक्स लाईफशी जोडण्यात येत आहे. तशा पोस्ट ही सोशल मिडीया वर व्हायरल आहेत. अनेक मीम्स ही Whatsapp वर फिरतायत.
यावर आम्ही सेक्स स्पेशलिट डॉक्टर शंतनु अभयंकर यांना प्रश्न विचारला त्यावर 'माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात कोरोना लसीबद्दल अशी कोणतीच माहीती आली नाही, त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी सध्यातरी सेफ आहे.' असं मत त्यांनी व्यक्त केलं. आत्तापर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सलाईफ मध्ये फरक पडल्याची कोणतीही तक्रार नोंदवल्याची जाहीर बातमी नाही.
आम्ही या संदर्भात डॉ.अनुकूल सांगवीकर यांच्याशीही बोललो त्यावर त्यांनी 'कोरोनाची लस ही वेगवेगळ्या प्राण्यावर चाचणी करून, पूर्णतः सेफ असल्यासच ती कोरोना रूग्णांना दिली जाते. काही कंपन्या वायग्रा आणि इतर महत्वाच्या लसींचे उत्पादन करतात. त्यामुळे त्यांनी याबाबत नीट अभ्यास करून कोरोना लस बाजारात आणली असावी' अशी प्रतिक्रीया दिली.
मात्र सेक्स ही अत्यंत खाजगी बाब असल्यामुळे त्या संबंधित जरी तक्रारी आल्या, तरी त्या जाहीर करता येतील का? हा ही प्रश्न आहे. तूर्त कोरोना लसीचा परिणाम सेक्शुअल लाईफवर झाल्याचं वृत्त नसल्याने आपणही ही लस निर्धास्तपणे टोचून घेऊ शकता.