लग्नानंतर महिलांना संभोगाची भिती वाटते का? / Newly married couples Problems / Explains Dr. Rahul Patil
तुमचं लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे का? त्यामागचं कारण आपण कुणालाही सांगू शकत नाही का? नवरा बायकोपैकी कुणाचंही हे कारण असू शकतं.. 'ते' कारण आणि त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ!
X
सेक्स याविषयावर आजही आपल्या इथं कानातल्या कानातच बोललं जातं. मनात अनेक शंका असतात मात्र याची उत्तरं आपल्याला कुठेच भेटत नाहीत. या शंका मनात घेऊनच अनेक लोक स्वतःला आयुष्यभर दोषी ठरवत राहतात. स्त्री-पुरुष दोघांमध्ये असणाऱ्या लैंगिक समस्यांवर उघडपणे बोललं पाहिजे. याच हेतूने आम्ही #MaxWoman च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री आणि पुरुषांना येणाऱ्या लैंगिक समस्यांवर वाचा फोडत आहोत. कोल्हापूर येथील प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट राहुल पाटील हे या विविध समस्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अर्थात पहिला विषय आहे 'वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्या म्हणजे काय?' लैंगिक समस्या ह्या फक्त पुरुषांनाच असतात असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं आणि असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असाल, वाचल असाल किंवा अनेकांना बोलताना पाहिलं असाल पण असं अजिबात नाही. स्त्रियांना देखील लैंगिक समस्या असतात. स्त्री सुद्धा एक मानव आहे तिला सुद्धा लैंगिक इच्छा असतात.
मग स्त्रियांमध्ये सुद्धा लैगिंक इच्छा कमी असणे किंवा अधिक असणे असं होऊ शकतं. बऱ्याच वेळा घटस्फोटाच्या वेळी स्त्रिया सांगतात की, पुरुषांच्या लिंगात ताकद नाही किंवा पुरुष नामर्द आहे. पण नेहमी असंच होतं का? तर अनेक केस स्टडी केल्यानंतर डॉक्टर राहुल पाटील सांगतात की, अनेक वेळा असंही समोर आला आहे की, "पुरुषाला लैंगिक इच्छा आहेत मात्र स्त्रीला लैंगिक इच्छा नाही. सेक्स करते वेळी स्त्री लवकर कामुक होत नाही किंवा स्त्रियांचे समाधान होत नाही." मग हे असं का होतं बरं तर यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये स्त्रीला असलेली भीती किंवा स्त्रीला सेक्स विषयी असलेली घृणा किंवा आणखीनही बरीच करणे आहेत. तर अशा प्रकारे स्त्रियांमध्ये देखील समस्या असतात. याचं समस्यांना वाचा फोडली पाहिजे. याविषयी खुलेपणानं बोललो पाहिजे. त्यामुळेच वैवाहिक जीवनात समस्या काय आहेत? त्यावर काय उपाय आहेत हे पाहण्यासाठी डॉ. राहुल पाटील यांचा हा सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओ नक्की पहा..