2 वर्षांच्या मुलीचं वजन 45 किलो; डॉक्टर म्हणतात...
X
घरातील लहान मुलांचे वजन वाढवा म्हणून पालक अनेकदा प्रयत्न करतात. त्यासाठी बऱ्याचवेळा डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो. मात्र दिल्लीत एका दोन वर्षे मुलीचं वजन तब्बल 45 किलो असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता डॉक्टर ही चक्रावले आहे
नवी दिल्लीत राहणाऱ्या ख्याती वार्षने या मुलीचं वय आहे तब्बल 45 किलो असल्याने सर्वच आश्चर्यात पडले आहे.ख्यातीचे वजन कमी करण्यासाठी तिच्यावर लठ्ठपणा कमी करण्याची
'बॅरियाट्रिक' शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.तसं पाहिले तर एवढ्या छोट्या मुलांवर ही शस्त्रक्रिया केली जात नाही.
ख्यातीच्या वाढत्या वजनामुळे तिचे पालक सुद्धा चिंतेत आहे. 2 वर्षात जर 45 किलो वजन असेल तर पुढे वय वाढल्यावर वजन सुद्धा आणखी वाढेल याची त्यांना चिंता लागली आहे.
फक्त 2 वर्षांच्या मुलीचं 45 किलो वजन असू शकते यावर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहे. त्यामुळे ख्यातीचे वजन वाढण्याचे कारण शोधणे त्यांच्यासमोर आव्हान आहे. त्यासाठी काही डॉक्टर अभ्यास सुद्धा करत असल्याचं बोलले जात आहे.
तर 'बॅरियाट्रिक' शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन आठवड्यानंतर आता हळुहळु परिणाम दिसू लागलेत. ख्यातीचं वजन 5 किलोनं कमी झालंय. मात्र अजूनही तिला हालचाल करण्यासाठी व्हिल चेअरचाच आधार घ्यावा लागतोय. पण डॉक्टरांचे प्रयत्न सुरूच आहे.