डोळे निरोगी ठेवण्यासाठी 7 सोपे व्यायाम
X
पावसामुळं अनेक भागात पूर आलाय, पाणीही साचलंय. त्यामुळं विषाणू आणि संसर्गजन्य आजार वाढत आहेत. अशावेळी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह सध्या वाढतोय. त्याचा सहज प्रसार होऊ शकतो. अशावेळी तो प्रसार रोखण्यासाठी, आपले हात वारंवार धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी असताना आपल्या डोळ्यांना स्पर्श करण्याचं टाळणं महत्वाचं आहे. सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न करावा आणि सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना काळजी घ्यावी. डोळ्यातील लालसरपणा, खाज सुटणे, चिकटपणा आणि वेदना याकडे दुर्लक्ष करू नये.
आपले डोळे निरोगी आणि फ्लू-मुक्त ठेवण्यासाठी काही साधे पण प्रभावी व्यायाम पाहू या.
1. वेगाने चालणे
वेगाने चालणे हा एक प्रभावी व्यायाम आहे जो डोळ्यांसह संपूर्ण शरीरात रक्त प्रवाहीत करतो. एकूण रक्ताभिसरण आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालले पाहिजे.
2. सायकलिंग
सायकलिंग हा एक उत्तम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आहे. ज्यामुळे डोळ्यांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. नियमित सायकलिंग मुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास आणि डोळ्यांच्या फ्लूपासून बचाव करण्यास मदत करू शकते.
3. एरोबिक्स
जंपिंग जॅक आणि नृत्य यासारख्या एरोबिक व्यायाम केल्यानं हृदयाची गती वाढते आणि त्यातून डोळ्याचं आरोग्यही चांगलं राहतं. अश्रूंची निर्मिती झाल्यानं दूषित घटकांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात, डोळ्यांच्या संसर्गाचा धोका कमी करतात.