कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसेल ? पाहा...
X
मंगळसूत्राचे महत्त्व भारतीय संस्कृतीत खूप मोठे आहे. मंगळसूत्र हा एक पारंपरिक दागिना आहे, जो विवाहित महिलांनी घालण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात मंगळसूत्राचे विशेष महत्त्व असून मंगळसूत्र महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. विविध डिझाइन आणि रंगांमध्ये उपलब्ध असलेले मंगळसूत्र विविध साड्या व पोशाखांबरोबर शोभून दिसतात. काही ठिकाणी मंगळसूत्रात वापरलेले सोने किंवा चांदी देखील संपत्तीचे प्रतीक मानले जाते. सणासुदीच्या काळात महिला आकर्षक दिसण्यासाठी विविध प्रकारचे दागिणे घालतात. विविध साड्यांवर कोणते मंगळसूत्र सोभून दिसतील हे जाणून घेऊयात
कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र जोस्त शोभून दिसत?
सिल्कच्या, काठापदराच्या, जॉर्जेट, फॅन्सी अशा वेगवेगळ्या साड्या सणासुदीला नेसल्या जातात. साडीवर कोणतं मंगळसूत्र घालायचं हे माहीत असेल तर तुमचा लूक अधिकच खुलून येतो.
जर तुम्ही काठापदराची किंवा गोल्डन आर्ट असलेली साडी नेसत असाल तर गोल्डन पारंपरिक मंगळसूत्र घाला.
फॅन्सी किंवा पार्टी वेअरची साडी असेल तर काळे मणी आणि खड्यांचे पेंडल असलेले मंगळसूत्र घाला.
खणाच्या साडीवर ऑक्साईड मंगळसूत्र शोभून दिसतं. सध्या ऑक्साईड ज्वेलरीचा क्रेझ पाहायला मिळतो.
जर तुम्ही साधी प्लेन साडी नेसणार असाल तर छोटं मंळसूत्र घालू शकता. सणासुधीच्या काळात बाहेर समारंभाला जाण्यासाठी मोठ्या मंगळसूत्राबरोबर गळ्यातल्या हारांचा सेट घालायला विसरू नका.