Home > Entertainment > "सिच्युएशनशिप" म्हणजे काय ?

"सिच्युएशनशिप" म्हणजे काय ?

सिच्युएशनशिप म्हणजे काय ?
X

मैत्री, प्रेम आणि नातं हे सगळे शब्द आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात फार ऐकायला मिळतात. पण सध्या या सगळ्या गोष्टींमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे तो म्हणजे "सिच्युएशनशिप". तर नेमकं काय आहे सिच्युएशनशिप प्रकरण जाणून घेऊया.

सिच्युएशनशिप म्हणजे काय ?

आजकाल तरुणांमध्ये सिच्युएशनशिपचे खूप ट्रेंड आहे. यामध्ये दोन व्यक्ती कोणत्याही जबाबदारी शिवाय एकमेकांशी जोडल्या जातात. कोणतीही आश्वासने नाहीत, भविष्याबद्दल कोणतीही चर्चा नाही याशिवाय सिच्युएशनशिप मध्ये दोघेही वैयक्तिक प्रश्नांपासून वेगळे राहतात. या नात्यात दोघेही कोणत्याही अटीशिवाय एकत्र राहतात आणि चांगला वेळ घालवतात. सिच्युएशनशिपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये व्यक्ती जबाबदारी पासून मुक्त असतो. हे नाते कोणत्याही कारणाशिवाय संपुष्टात येऊ शकते. अशा प्रकारे समजून शकतो की, दोन लोक एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र राहतात. यामध्ये दोघेही एकमेकांसोबत बाहेर जाऊ शकतात, लंच किंवा डिनर करू शकतात, या नात्याला कोणतेही "नाव" दिले जात नाही.

सिच्युएशनशिप आणि रिलेशनशिपमधील फरक काय?

रिलेशनशिपमध्ये खूप फरक आहे. या दोघांमध्ये नातेसंबंधाचा अर्थ वेगळा आहे. यात दोन व्यक्ती प्रेमामुळे एकमेकांशी जोडल्या जातात, तर सिच्युएशनशिपमध्ये दोन लोकं त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जोडलेले असतात. रिलेशनशिप मध्ये दोन लोक एकमेकांची जबाबदारी घेतात. पण सिच्युएशनशिपमध्ये असे काहीही घडत नाही. जेव्हा दोन लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा ते एकमेकांना सर्व प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे विचारू शकतात, तर सिच्युएशनशिपमध्ये कोणतेही वैयक्तिक प्रश्न विचारले जात नाहीत. रिलेशनशिप मध्ये दोन लोकांना त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे असते. पण सिच्युएशनशिप मध्ये दोन लोक फक्त थोड्या काळासाठी एकत्र राहतात. रिलेशनशिप मध्ये लोकांना जेव्हा एकमेकांपासून वेगळे व्हायचे असते तेव्हा काहीतरी कारण द्यावी लागतात, तर सिच्युएशनशिप मध्ये कोणतेही कारण न देता वेगळे होऊ शकतात. सिच्युएशनशिपमध्ये दोन व्यक्तींच्या दरम्यान असलेला एक अनौपचारिक नातेसंबंध ज्यामध्ये भावनिक किंवा शारीरिक आकर्षण असले तरीही तो नातेसंबंध जास्त स्पष्ट किंवा बांधिलकी असलेला नसतो.

Updated : 22 Oct 2024 2:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top