International बेईज्जती : भारतीय सेलिब्रीटींना अमांडा सर्नी म्हणते "या येड्यांना कुणी काम दिलं"
X
शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाल्यावर "हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे प्रोपोगंडा करु नका" अशा आशयाचे ट्वीट भारतीय क्रिकेटपटू व कलाकारांकडून करण्यात आली. भारतीय सेलिब्रीटींच्या याच ट्वीटवर अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने "या येड्यांना कुणी काम दिलं" असं म्हणत पुन्हा एकदा आपला शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचं सांगीतलं आहे.
"ज्यांनी खरी प्रचार मोहिम सुरु केली आहे, त्या मुर्खांना कामावर कोणी घेतलं आहे? एक असंबंध व्यक्ती भारताचं विभाजन करण्याचं षडयंत्र करत आहे आणि त्यासाठी तिला पैसे मिळत आहेत? जरा तरी विचार करा. निदान यात थोडाफार वास्तववादीपणा ठेवा", असं ट्विट अमांडाने केलं आहे.
Who hired the idiots that wrote this propaganda. "A completely unrelated group of Celebrities conspiring end being paid to destroy india"? I mean come onnnnnnn. At least make it SOMEWHAT realistic:
— Amanda Cerny (@AmandaCerny) February 3, 2021
दरम्यान, देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाल्यामुळं अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर विराट कोहली यांनी ट्विट करत याला आंतरराष्ट्रीय 'षडयंत्र' म्हटलं होतं. त्यावर अमांडाने या बॉलिवूड कलाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.