हिच ती चिमुकली जिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे...
X
5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकमधील विराजपेठ येथे रश्मीकाचा जन्म झाला. कर्नाटकातील कोडागू या जिल्ह्यांमध्ये विराजपेठ हे शहर आहे. रश्मिकाचे वडील एक बिझनेसमन आहेत तर आई हाउसवाइफ आहे.
रश्मीकाने सायकॉलॉजी, जर्नालिझम आणि इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये पदवी संपादन केली आहे. तर पुढे एमएस रमैया कॉलेजमधून मानसशास्त्र आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे.
रश्मिकाला प्रवास आणि जिमिंगची खूप आवड आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री ती जीममध्ये नेहमीच वर्कआऊट करताना दिसते.
वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तीचा सर्वप्रथम चित्रपट 'किरिक पार्टी' हा होता. त्यानंतर रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार बनली. तीला अनेक चित्रपटाची संधी मिळु लागले.
रश्मिका मंदान्नाला कर्नाटकमध्ये कर्नाटक क्रश म्हणुन ओळखले जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिची गोंडस फोटोंची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिचे बोलके डोळे आणि तिच्या स्मित हास्याने तिने अनेकांना घायाळ केले आहे.
संध्याला पुष्पाच्या जबरदस्त यशानंतर पुष्पाच्या श्रीवल्लीची लॉटरी लागली आहे. दाक्षिणात्य सिनेमांसोबतच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे. मोठे मोठे दिग्दर्शक रश्मिकाबरोबर काम करू इच्छित आहेत. रश्मिका मंदान्ना ही कन्नड आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
२०१६ मध्ये रश्मिका मंदान्ना हिची तिच्या पहिल्या चित्रपट “किरिक पार्टी” साठी निवड झाली होती आणि याच दरम्यान तिची भेट “रक्षित शेट्टी” सोबत झाली होती, जो या चित्रपटात तिच्या विरुद्ध अभिनेता होता. या चित्रपटादरम्यानच रश्मिका आणि रक्षित जवळ आले आणि त्यांनी 3 जुलै 2017 रोजी त्यांच्या मूळ गावी विराजपेट येथे लग्न केले आणि परस्पर समंजस समस्यांमुळे सप्टेंबर 2018 मध्ये ते वेगळे झाले.