बॉलीवुडच्या या बड्या २ सेलिब्रिटींच्या घरी २०२१ मध्ये होणार नव्या पाहुण्यांचं आगमन...
X
'आई' या शब्दात प्रेम, वात्सल्य, माया, ममता अशा अनेक प्रेमळ शब्दांचा अर्थ लपलेला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत येत्या २०२१ वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडच्या कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांच आगमन होणार आहे.
अनुष्का शर्मा – विराट कोहली
संपूर्ण भारतात मोस्ट फेवरेट असलेलं कपल म्हणजे अनुष्का आणि विराट. ११ डिसेंबर २०१७ ला अनुष्का आणि विराट यांनी अचानक इटली मध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं आणि त्यानंतर सर्वांना एक आनंदाचा सुखद धक्काच बसला. यानंतर या दोघांच्या जोडीची चर्चा सातत्याने होत आहे. एकमेकांना लग्नाच्या बंधनात बांधल्या नंतर आता हे जोडपं आयुष्याच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी अर्थात आई-बाबा होण्यासाठी तयार आहेत. अनुष्काच्या गरोदरपणाची बातमी जाहीर करत या जोडप्याने विराट आणि अनुष्कानं त्यांचा फोटो पोस्ट केला होता. जानेवारी २०२१ मध्ये ज्युनिअर शर्मा-कोहलीचे आगमन होणार आहे.
करिना कपूर खान – सैफ अली खान
करिना आणि सैफ हे २०२० मध्ये दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत, करीना आणि सैफ यांनी १६ ऑक्टोबर २०१२ ला लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या ४ वर्षांनी त्यांना २० डिसेंबर २०१६ ला पहिला मुलगा झाला होता. करिना आणि सैफने त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं. तैमूर इतका गोंडस आहे की करिना-सैफ पेक्षा माध्यमांमध्ये त्याच्या प्रत्येक हालचालींवर चर्चा होत असते. मात्र तैमूर आता चार वर्षाचा झाल्यानंतर करिना आणि सैफ दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. १२ ऑगस्ट २०२० रोजी करिना आणि सैफनं याची अधिकृत घोषणा केली.