Home > Entertainment > अश्या अभिनेत्री ज्यांनी राजकारणात सुद्धा आपली जादू कायम ठेवली

अश्या अभिनेत्री ज्यांनी राजकारणात सुद्धा आपली जादू कायम ठेवली

अश्या अभिनेत्री ज्यांनी राजकारणात सुद्धा आपली जादू कायम ठेवली
X

तुम्ही बॉलीवूडचे अनेक चित्रपट पाहिले असतील आणि चित्रपटातील अभिनेत्रींना तुम्ही पसंद देखील करत असाल. परंतु अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी फक्त चित्रपटातच नाही तर राजकारणात देखील नाव कमविले आहे ... आता या कलाकारांबद्दल अधिक जाणून घ्या ...

हेमा मालिनी



"ड्रीम गर्ल" या नावाने प्रसिद्ध असलेल्या 'हेमा मालिनी' यांनी चित्रपटात जबरदस्त नाव कमविले आहे. तसेच राजकारणात चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. त्या 2004 मध्ये भाजप गटात सामील होत्या. त्या सध्याच्या राजकारणातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक आहे. तर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

जया बच्चन



एकेकाळी बॅालिवुडमध्ये गुड्डी या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जया बच्चन लग्नानंतर त्या चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत. चित्रपटाच्या कारकिर्दीनंतर त्यांनी 2004 साली समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांची राजकारणाने एक नवी ओळखही सर्वांच्या समोर आली आहे.

रेखा



रेखा ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. रेखा यांनी राजकारणात आपले नाणे गुंतवुन ठेवले आहे. रेखा यांनी २०१२ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेवर निवडून आल्या. रेखाने राजकारणात प्रवेश केल्यानंतरही तिने चित्रपट करणे सुरूच ठेवले आणि आताही आपण तिला काही चित्रपटांमध्ये पाहू शकता.

जयललिता



कोमलवल्ली हे जयललिता यांचे खरे नाव होते. यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. त्यांचा सर्वात पहिला चित्रपट 1965 मध्ये वेनिरा आदै. या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदी निवड होण्यापूर्वी प्रवास केला होता. जयललिता अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गाठली. 2016 मध्ये निधन होण्यापूर्वी त्यांनी सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

स्मृती झुबीन इराणी




२००३ साली स्मृती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिब्बल विरुद्ध निवडणुक लढवली. स्मृती झुबीन इराणी हे महिला व बालविकास मंत्री या व्यतीरीक्त केंद्र सरकारच्या केंद्रीय कापड मंत्री म्हणून काम करत आहेत. "क्योंकी सास भी कभी बहू थी" या दूरचित्रवाणी मालिकेत तुलसीची भूमिका साकारल्यानंतर स्मृती इराणी प्रसिद्ध झाल्या. स्मृती इराणी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून स्वतःला अभिनयापासून दूर केले आहे. 2019 मध्ये उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत स्मृतींनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

या सर्व अभिनेत्री होत्या ज्यांनी राजकारणातही आपले नाव कमावले आहे.

Updated : 29 March 2023 7:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top