Home > Entertainment > तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक

तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक

तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक
X

तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun Arrested) यास पोलिसांनी अटक केली आहे. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'पुष्प 2' (Pushpa 2) चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी (Hyderabad Stampede) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या चेंगराचेंगरीत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या बॉडीगार्ड्स विरोधात गुन्हा दाखल केला. चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun News) आणि त्याच्या टीमच्या उपस्थितीबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे घडलेल्या घटनेस अभिनेत्यासह इतर लोक जबाबदार असल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

अल्लू अर्जून याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप

'पुष्प 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात अभिनेता अल्लू अर्जुन याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाट्यगृहातील गोंधळाच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले ", असे पोलिसांनी सांगितले.

https://youtube.com/shorts/9KM--3KtaaA?si=म्म९ब्जक्सक्सिसगेफह९य

Updated : 13 Dec 2024 3:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top