काळे कपडे परिधान करून रेमो डिसूझा पोहचला कुंभमेळ्यात
X
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा सध्या चर्चेत आहे, कारण अलीकडेच रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. फक्त रेमो डिसूजाच नाही तर त्याच्यासोबत इतर काही स्टार्सनाही पाकिस्तानमधून धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. रेमो डिसूझाला धमक्या मिळाल्या असतानाच आता तो मुंबई सोडून प्रयागराजला पोहोचला आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत, प्रत्येकजण प्रयागराजला येत आहे आणि गंगा नदीत डुबकी मारून गंगा मातेचा आशीर्वाद घेत आहेत. इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी प्रयागराजमध्ये येऊन गंगास्नान केले, आता या यादीत रेमो डिसूझाचं नावही आलं आहे. रेमो डिसूझा अलीकडेच धमकी प्रकरणावरून चर्चेत आला आहे. आणि त्यानंतर रेमोने कुंभमेळातील फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये रेमो डिसूझाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आणि रेमोने काळ्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात चेहरा अर्धवट झाकलेला आहे. ने गुप्त मोडमध्ये गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वत: प्रार्थना करताना, पवित्र गंगा नदीत डुबकी मारल्याचे आणि बोटीने परिसराचा फेरफटका मारल्याचे फुटेजही दाखवले. व्हिडिओने प्रयागराजचे शांत पण चैतन्यपूर्ण वातावरण उत्तम प्रकारे दाखवले आहे.