अभिनेत्री रकुलप्रीत सिंह कोरोना बाधीत, ट्वीट करुन दिली माहिती
X
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून अभिनय केलेली अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला कोणत्याही स्वरुपाचा त्रास झालेला नाही. रकुलप्रीतने मागील काही दिवसांमध्ये तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. ट्वीट करुन रकुलप्रीतने कोरोना झाल्याची माहिती सर्वांना दिली. कोरोना झाल्यामुळे मी घरातच क्वारंटाइन झाले आहे, असे रकुलप्रीतने सांगितले.
😊💪🏼 pic.twitter.com/DNqEiF8gLO
— Rakul Singh (@Rakulpreet) December 22, 2020
रकुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला तुमच्या सर्वांना सांगायचे आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. मी स्वत: ला क्वारंटीन केले आहे. मला बरं वाटतंय आणि छान विश्रांती घेईन जेणेकरून मी पुन्हा शूटवर जाऊ शकेन. माझ्याशी भेटलेल्या लोकांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती, धन्यवाद आणि सुरक्षित रहा.
❤️❤️ so grateful !! Can't wait to join 😁😁 https://t.co/RFbgNaR38T
— Rakul Singh (@Rakulpreet) December 11, 2020
दरम्यान, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, रकुल प्रीतचे नाव ड्रग्जच्या तपासणीत पुढे आले होते. रकुलला एनसीबीने 25 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीने रकुल प्रीत सिंहची बऱ्यात तास चौकशी केली होती. रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे समोर आली होती.