Home > Entertainment > राहाने दिल्या पापाराझींना "ख्रिसमस" च्या शुभेच्छा

राहाने दिल्या पापाराझींना "ख्रिसमस" च्या शुभेच्छा

राहाने दिल्या पापाराझींना ख्रिसमस च्या शुभेच्छा
X

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या बेबी प्रिन्सेस राहाची ओळख जगासमोर करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पापाराझींना "मेरी ख्रिसमस" च्या शुभेच्छा देतानाचा राहाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

काल, ख्रिसमसच्या निमित्ताने, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि त्यांची मुलगी राहा यांनी एकत्र येत मीडियाला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

राहाने सर्वांना 'मेरी ख्रिसमस'च्या दिल्या शुभेच्छा

आता व्हायरल होत असलेल्या आणि राहाच्या गोंडसपणावर सर्वांना आनंदित करणाऱ्या व्हिडिओमध्ये आलिया बाहेर असलेल्या मीडियाला आवाज कमी ठेवण्याची विनंती करताना दिसत आहे. काही क्षणांनंतर, रणबीरने राहाला कारमधून बाहेर आणले, आणि त्यात राहा पापाराझींना "मेरी ख्रिसमस" च्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. सुंदर पांढरा फ्रॉक परिधान केलेल्या राहा भट्ट कपूरने सगळ्यांना गोड आवाजात शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून "viralbhayani" या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

Updated : 26 Dec 2024 10:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top