Home > Entertainment > "आपला कान, आपली जबाबदारी, गुरुवारचं गाणं माणसाच्या आरोग्याला घातक ठरू शकतं"

"आपला कान, आपली जबाबदारी, गुरुवारचं गाणं माणसाच्या आरोग्याला घातक ठरू शकतं"

आपला कान, आपली जबाबदारी, गुरुवारचं गाणं माणसाच्या आरोग्याला घातक ठरू शकतं
X

अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुरुवारी नवीन गाणं येणार असल्याची माहिती दिली. याच मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सनी आपल्याला अजून ट्रोल करावं असं म्हटलं. आता अमृता फडणवीस यांचं हे म्हणणं चांगलंच मनावर घेतल्यासारखं दिसतंय.

कारण, हे गाणं येण्याआधीच अमृता यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे.

पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे, असं याचीकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. तसेच पुढे, "आपला कान, आपली जबाबदारी" असंही लिहिण्यात आलं आहे.

https://www.change.org/p/amruta-fadanvis-want-to-protect-the-environment-by-urging-to-not-sing-and-hence-to-stop-the-sound-pollutio?redirect=false


Updated : 15 Dec 2020 12:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top