Home > Entertainment > "एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…", L&T कंपनीच्या अध्यक्षांवर दीपिका भडकली

"एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…", L&T कंपनीच्या अध्यक्षांवर दीपिका भडकली

एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…, L&T कंपनीच्या अध्यक्षांवर दीपिका भडकली
X

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने लार्सन अँड टुब्रो (L&T) चे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांच्या 90 तासांच्या कामाचा आठवडा लागू करण्याबाबत आणि कर्मचाऱ्यांना रविवारी काम करायला लावल्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली आहे. दीपिका पदुकोणने इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसंच तिने मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.

L&T चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांचे विधान

कर्मचाऱ्यांशी संभाषणादरम्यान, एसएन सुब्रह्मण्यन यांनी अत्यंत कार्यसंस्कृतीचे समर्थन करणारे विधान केले. ते म्हणाले, “मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो तर मला जास्त आनंद होईल, कारण मी रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”

एसएन सुब्रह्मण्यन यांच्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करत आहेत. सुब्रह्मण्यन यांच्या या विधानामुळे पुन्हा वर्क लाईफ बॅलेन्सचा मुद्दा चर्चेत आला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण काय म्हणाली?

दीपिका पदुकोणने एसएन सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून यासंबंधीत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पत्रकार फये डिसूझा यांच्या या वक्तव्यासंबंधीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका पदुकोणने म्हटले आहे की, “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करताना पाहून धक्का बसला. #मेंटाळेअल्थमत्तेरस

Updated : 10 Jan 2025 10:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top