रडण्याची गरज नव्हती... "Bigg Boos 18" मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
X
वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉस मराठी 5 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. वर्षा उसगांवकर यांना रितेश देशमुख यांच्या बिग बॉस मराठी ५ च्या शोमध्ये 7 व्या क्रमांकावर आपला प्रवास थांबवावा लागला. आपल्या सर्वांना माहीत आहे की, वर्षा यांच्या कामगिरीला जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. वर्षा उसगांवकर यांना घरात निक्की तांबोळीचा खूप त्रास होत होता. आता सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा अठरावा सिझन सुरू आहे. यामधील स्पर्धक शिल्पा शिरोडकर या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी शिल्पाच्या खेळीवर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
वर्षा उसगांवकर यांनी शिल्पा शिरोडकरचे कौतुक केले आणि सांगितले की, शिल्पा घरात ज्याप्रकारे शांत मनाने स्वत: ला छान हाताळत आहे ते मला आवडतंय. मात्र, जेव्हा शिल्पा घरात विनाकारण भावनिक होते ते गरजेचं नाही. वर्षा यांनी Etimes टीव्हीला सांगितले की, “ती काही वेळा भावूक झाली असली तरी मला वाटते की इतकं भावनिक होण्याची गरज नव्हती. अर्थात ते व्यक्तीवर अवलंबून असतं. मला तिच्यावर टीका करायची नाही, पण रडायची गरज नव्हती असे मला वाटते; त्याबद्दल इतके वाईट वाटण्याची गरज नव्हती."