ऑनलाईन खरेदीमुळे स्थानिक व्यापारी नाराज
X
दिवाळीनिमित्त विविध शहरातील बाजारपेठेत आकर्षक कंदील आणि लाइटिंग विक्रीसाठी दुकानात दाखल झाले आहेत. परंतु, दिवाळीला सुरुवात व्हायला काही दिवसच बाकी असताना बाजारात पाहिजे तशी रेलचेल दिसत नाही. आजकाल ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने त्याचा परिणाम स्थानिक दुकानदारांवर होताना दिसत आहे. ग्राहकांनी स्थानिक दुकानावर येऊन वस्तूंची शहानिशा आणि आकर्षक वस्तू खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेक्षा चांगली वस्तू ग्राहकांना मिळू शकते आणि यात व्यापारांचाही फायदा होऊ शकतो. यावर्षी काही प्रमाणात भाव वाढ झाल्याने पूर्वीसारखा ग्राहक उत्सवाच्या काही दिवस आधी बाजारात येत नाही. दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी ग्राहक खरेदी करण्यासाठी बाजारात येत असतात तेव्हाच बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असते असे व्यापाऱ्यांनी सांगितले.