इंडोनेशियातील गोंडस भाऊ-बहिणीने गायले 'कहो ना प्यार है' गाणं, गाण्याचा व्हिडिओ व्हायरल
X
सोशल मीडियावर चिमुकल्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ विविध कारणांमुळे लोकांना आकर्षित करतात. काही व्हिडिओमध्ये चिमुकल्यांचा क्यूट डान्स असतो, तर काही व्हिडिओमध्ये लोकप्रिय गाण्यांवर नाचत असतात, तेव्हा ते बघणाऱ्यांना खूप आनंद होतो. याशिवाय, काही व्हिडिओ चिमुकल्यांच्या गाण्यांच्या गोड सुरांवर आधारित असतात, ज्यामुळे त्यांच्या आवाजाचा चमत्कारी परिणाम लोकांवर होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन चिमुकल्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत दोघं बहीण-भाऊ 'कहो ना प्यार है' हे गाणं म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
इंडोनेशियाच्या रेस्तू सिंगीहने काही दिवसांपूर्वी 'चलते चलते' गाणं गाऊन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. इंस्टाग्रामवर या मुलाची फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत आहे. आता या मुलाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आपल्या बहिणीसोबत 'कहो ना प्यार है' चे टायटल सॉन्ग गात आहे. दोन्ही मुलांनी मिळून एवढा अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे की, सोशल मीडिया यूजर्सही त्यांच्यासाठी वेडे झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, मोठा भाऊ गिटार वाजवतोय आणि गातोय. त्याची धाकटी बहीणही त्याला साथ देतेय. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या Instagram हँडल restu_singgih_hanggara वर शेअर केला आहे. ही क्लिप सध्या धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 41 हजारांहून अधिक लाईक्स आणि 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.