Home > Entertainment > तृतीयपंथीयांच्या आयुष्यात घडणारी गोष्ट मी एका क्षणात अुनभवली; कृतिका देव

तृतीयपंथीयांच्या आयुष्यात घडणारी गोष्ट मी एका क्षणात अुनभवली; कृतिका देव

तृतीयपंथीयांच्या आयुष्यात घडणारी गोष्ट मी एका क्षणात अुनभवली; कृतिका देव
X

ताली (Taali),ट्रान्सजेंडर ( Transgender) कार्यकर्त्या गौरी सावंतचा ( Gauri sawant) बायोपिक ज्यामध्ये सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे १५ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यापासून वेब सिरीजला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

सुष्मिता सेनच्या ( Susmitha Sem)‘ताली’ या वेबसिरीजमधील तरुण गणेशच्या भूमीखेत दिसणारी अभिनेत्री कृतिका देवने (krutika dev) शूटिंगच्या दरम्यान गढलेली एक आठवण सांगितली . ताली हा चित्रपट ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या वास्तविक जीवनावर आणि संघर्षांवर आधारित आहे . यात सुष्मिता मोठी झालेली गौरी तर कृतिका लहान गणेशाची भूमिका करते.

कृतिकाने 'ताली'च्या शूटिंगदरम्यानचा तिचा एक अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली, आम्ही मुंबईत पोहोचल्यानंतर जेव्हा गणेशला भीक मागण्यास भाग पाडले जाते, तो सीन शूट करताना, आम्ही छुप्या कॅमेर्‍यांसह वास्तविक स्थानांवर शूट केले. मी एकटीच तिथे उभी होती, एक माणूस आला आणि मला १० रुपये दिले आणि आशीर्वाद दिला. तो क्षण आठवूनही मला गॉसबंप्स येतात. त्यांना वाटले मी भीक मागत आहे. माझ्या अभिनयासाठी ही एक प्रकारची प्रशंसा असल्याचं मला कौतुक आहे. आमचे DOP राघव सर (Raghav Ramdas) यांनी मला ती नोट फ्रेम करून घ्यावी, असे सुचवले. त्यावरून मला जाणवलं की गौरी सावंत आणि तिच्यासारख्या अनेक जण आजही अशाच प्रसंगातून जात आहेत. त्याच्याशी जुळवून घेणे कठीण होते.”

Updated : 23 Aug 2023 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top