Home > Entertainment > सुनील शेट्टीची एन्ट्री तरुण नायकांनाही टाकेल मागे...

सुनील शेट्टीची एन्ट्री तरुण नायकांनाही टाकेल मागे...

सुनील शेट्टीची एन्ट्री तरुण नायकांनाही टाकेल मागे...
X


सुनील शेट्टीचा "हंटर"चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे .अमेझॉन मिनी टीव्हीवर हंटर चा ट्रेलर आला असून यामध्ये सुनील शेट्टी तडफदार भूमिकेत दिसत आहे.

सुनील शेट्टी चा लुक इतका व्हायरल झाला आहे की या ट्रेलरला आठ दिवसांच्या आत 11 मिलियन इतके व्ह्यूज आले आहेत. यामध्ये इशा देओल सुद्धा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

"टूटेगा नही, तोडेगा"असा सुनील शेट्टीचा डायलॉग फेमस होत आहे .भरपूर दिवसानंतर सुनील शेट्टी नव्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे धडकन या सिनेमातील देव ची भूमिका सुनील शेट्टी मुळे चांगलीच रंगली होती. त्याचबरोबर सुनील शेट्टीचा विनोदी अंदाज सुद्धा प्रेक्षकांना भावला होता इतक्या वर्षानंतर सुनील शेट्टी परत या तडफदार भूमिकेत दिसत आहे.

बऱ्याच जणांनी "सुनील शेट्टी इज बॅक" अशी कमेंट केली आहे .लीना दास या पत्रकार ला मारण्यासाठी सुनील शेट्टीला पैसे दिले जातात यामध्ये दिव्या म्हणजेच इशा देओल सामील होते.ट्रेलर मधून पुन्हा एकदा सुपरहिरो आणि ऍक्शन हिरो च्या भूमिकेत सुनील शेट्टी पाहायला मिळत आहे.

सुनील शेट्टीची ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशीच चर्चा सध्या ट्रेलर मधून होताना दिसत आहे.

Updated : 22 March 2023 2:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top